Telly Masala : 'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव ते उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sunny Leone : साखरपुडा झाला, लग्नाची तारीख ठरली, पण होणाऱ्या नवऱ्यानं फसवलं अन् बेबीडॉल सनी लिओनीचं मोडलं पहिलं लग्न
सनी लिओनी (Sunny Leone) ही सध्या तिचा नवरा डॅनियलसोबत आनंदानं आयुष्य जगतेय. ते दोघेही तीन मुलांचे पालक आहेत. सनी लिओनीने डॅनियलसोबत 9 एप्रिल 2011 मध्ये लग्न केलं. पण डॅनियलशी लग्न होण्याआधी तिचं एक लग्न मोडलं होतं. याबाबत अभिनेत्रीने नुकतच आयुष्यातील या प्रसंगाबाबत खुलासा केला आहे. सनी सध्या MTV Splitsvilla X5: ExSqueeze Me Please हा शो होस्ट करतेय.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mirzapur 3: 'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली 'दिग्दर्शकांनी मला...'
बहुचर्चित 'मिर्झापूर' (Mirzapur 3) या सीरिजचा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या सीजनची प्रेक्षकांना देखील बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजच्या पहिल्या दोन सिजनमुळे तिसऱ्या सिजनबाबत देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढवून ठेवल्या आहेत. या सिरिजमधील प्रत्येक सीनबाबत तितकीच चर्चा झाली. यामधील इंटीमेट सीन्स विशेष करुन चर्चेत आले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Umesh Kamat : 'आज तिला सगळ्यात जास्त मिस करतो', उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी
उमेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. पण नुकतच त्याने मायलेक या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या आईच्या आठवणी शेअर केला आहेत. उमेशचे आईवडिल आता या जगात नाहीत. पण या क्षेत्रात काम करण्यासाठी आईवडिलांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी यावेळी उमेशनं सांगितलं. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' हा सिनेमा 19 एप्रिल रोजी सिनेमागृहात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता उमेश कामतनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kriti Sanon : 'बॉलीवूडमध्ये ना एकोपा, ना कुणी करतं सपोर्ट'; क्रिती सेननने व्यक्त केली मनातली खदखद
अभिनेत्री क्रिती सेननची (Kriti Sanon) मुख्य भूमिका असलेला 'क्रू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमामध्ये करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तब्बूसोबत (Tabbu) ती झळकली आहे. या सिनेमाच्या काही दिवसांपूर्वीच क्रितीचा शाहिद कपूरसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये आला होता. तिचा हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या आहेत. पण सध्या ही अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. क्रितीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या मनातली खंत व्यक्त केलीये. यावेळी तिने बॉलीवूडमध्ये कुणी कधीचा कुणाला सपोर्ट करत नाही, असं म्हटलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Actor : 'भाई'चं शुटींग सुरु असताना हार्टअटॅक आला अन्... , अभिनेत्याने आयुष्यातल्या 'त्या' प्रसंगाचा केला खुलासा; म्हणाला 'मला अक्षरश:'
अभिनेता सागर देशमुखने (Sagar Deshmukh) 'भाई' चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पु.लं देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सागरने पु.लं देशपांडे यांचीच भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे सागर आता कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण याच चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सागरच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला होत्या. त्या कठीण काळाविषयी सागरने भाष्य केलं आहे.