Mirzapur 3: 'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली 'दिग्दर्शकांनी मला...'
Mirzapur 3: मिर्झापूर सीरिजमध्ये बीना भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सीरिजमध्ये केलेल्या बोल्ड सीन्सविषयी भाष्य केलं आहे.
![Mirzapur 3: 'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली 'दिग्दर्शकांनी मला...' Mirzapur 3 release date OTT Rasika Dugal who played Bina Bhabhi shared her experienced while doing intimate scenes Entertainment Bollywood latest update detail marathi news Mirzapur 3: 'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली 'दिग्दर्शकांनी मला...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/07/c8f60381d2deb672b4697235b579176a1712456037160720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mirzapur 3: बहुचर्चित 'मिर्झापूर' (Mirzapur 3) या सीरिजचा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या सीजनची प्रेक्षकांना देखील बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजच्या पहिल्या दोन सिजनमुळे तिसऱ्या सिजनबाबत देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढवून ठेवल्या आहेत. या सिरिजमधील प्रत्येक सीनबाबत तितकीच चर्चा झाली. यामधील इंटीमेट सीन्स विशेष करुन चर्चेत आले.
यामध्ये अभिनेत्री रसिका दुग्गल हिने बीना भाभीची भूमिका साकारली आहे. तिने ऑनस्क्रिन अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्या सूनेचं पात्र साकारलंय. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत केलेल्या इंटिमेट सीन्सची देखील बरीच चर्चा झाली. या सिरिजमध्ये अभिनेत्रीने पंकज त्रिपाठी अर्थातच कालीन भैय्याच्या बायकोची म्हणजेच बीना त्रिपाठीची भूमिका केली आहे. नुकतच या अभिनेत्री एका मुलाखतीदरम्यान केलेल्या इंटिमेट सीन्सविषयी भाष्य केलं आहे.
कसे केले इंटीमेट सीन्स?
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत इंटीमेट सीन्स करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न रसिकाला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. यावर बोलताना रसिकानं म्हटलं की, त्या इंटीमेट सीन्सविषयी माझं दिग्दर्शकांशी आधीच बोलणं झालं होतं. अशा प्रकारचे सीन्स वेगळ्या पद्धतीने शूट केले जातात. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी मला सेटवर अवघडल्यासारखं वाटू दिलं नाही. ते सीन्स देताना माझ्यावर विशेष पॉवर असायच्या. ते सीन्स देताना मला त्या खोलीत कोणाचाही त्रास झाला तर मी त्या व्यक्तीला बाहेर जायला सांगू शकत होते.
ते सीन्स प्रोफेशनल पद्धतीने शूट केले जातात - रसिका दुग्गल
पुढे बोलताना रसिकाने म्हटलं की, मी त्या बोल्ड सीन्सकडे वेगळ्या दृष्टीने अजिबात बघत नाही. कोणत्याही महिला आणि पुरुषामध्ये शारीरिक संबंध होणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. अशा इंटीमेट सीन्सना अत्यंत प्रोफेशन पद्धतीने शूट केलं जातं. हे सीन्स देखील तसेच शूट केले गेले होते.
'मिर्झापूर सीझन 3' ची स्टारकास्ट
'मिर्झापूर सीझन 3' मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, ईशा तलवार आदींच्या मुख्य भूमिका आहेत
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)