एक्स्प्लोर

Telly Masala :  अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी घडणार अनोखं महानाट्य ते जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Satvya Mulichi Satavi Mulgi : अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी घडणार अनोखं महानाट्य, खरं रुप कळल्यानंतर नेत्रा कोणती शिक्षा देणार?

 झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satavi Mulgi ) ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या मालिकेत बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात. पण नेत्राला असलेल्या त्रिनैना देवीच्या वरदानामुळे ती येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच नेत्राला या अडणींवर मात करण्यासाठी इंद्राणी देखील तितकीच मदत करते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी मिळून विरुचकावर म्हणजे रुपालीवर प्रत्येक संकटात मात करु शकतात. पण आता या दोघींच्या वाटल्या अस्तिका नावचं नवं संकट आलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Ashok Saraf : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा सन्मान, अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव

 काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके मामा म्हणजेच अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला. तसेच आज म्हणजेच गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Prathamesh Parab Wedding : मेहंदी, हळद अन् आनंद, दगडूच्या लग्नविधींना सुरुवात, प्रथमेश आणि क्षितीजा अडकणार विवाहबंधनात

   टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड ( Kshitija Ghosalkar) हीच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याच्या हळदीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. तसेच त्याची होणारी पत्नी क्षितीजा हीचा देखील मेहंदी सोहळा पार पडला. क्षितीजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या मनात सागरविरोधात तिरस्कार भरला! बर्थ डे पार्टीत सावनीचं षडयंत्र यशस्वी होणार?

 'प्रेमाची गोष्ट'च्या  (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये आदित्यच्या बर्थ डे पार्टीत मेलोड्रामा दिसणार आहे. आदित्यने बर्थ डे पार्टीला आमंत्रित केल्यानंतर सागर प्रचंड आनंदी आहे. सई आणि मुक्तासोबत सागर आदित्यच्या बर्थ डे पार्टीत जाण्यासाठी सज्ज आहे. सागर सईला आदित्यबद्दल सांगतो. आदित्य आपल्यासोबत का राहत नाही असे सई विचारते. त्यावर सागर अनुत्तरीत होतो. तर, दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला मदत करण्यासाठी पावले उचलते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Divya khossla and Bhushan Kumar : टी-सीरिज, भूषण कुमारांना अनफॉलो केलं, नावातून कुमार काढलं; दिव्या खोसलाने असं का केलं? समोर आलं मोठं कारण

 बॉलीवूडमधील पावर कपल भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि त्यांची पत्नी दिव्या खोसला (Divya Khossala) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा कालपासून सुरु होत्या. पण आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून यामागचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. दिव्या खोसलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भूषण कुमरांना अनफॉलो केलं होतं. तसेच तिच्या नावातून कुमार हे आडनाव देखील काढलं होतं. त्याचप्रमाणे तिने टी सिरिजला देखील अनफॉलो केलं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Shiv Thakare ED Summons: 'बिग बॉस 16' चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकला ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे समन्स, नेमकं प्रकरण काय?

'बिग बॉस 16' चे स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thackeray ED Summons) आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. . एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे प्रकरण कथित ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित  असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.  वृत्तानुसार, या प्रकरणात साक्षीदार शिव आणि अब्दुचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget