Divya khossla and Bhushan Kumar : टी-सीरिज, भूषण कुमारांना अनफॉलो केलं, नावातून कुमार काढलं; दिव्या खोसलाने असं का केलं? समोर आलं मोठं कारण
Divya khossla and Bhushan Kumar Divorced Rummours : भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांच्या घटस्फोटाच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं समोर आलं आहे.
Divya khossla and Bhushan Kumar Divorced Rummours : बॉलीवूडमधील पावर कपल भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि त्यांची पत्नी दिव्या खोसला (Divya Khossala) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा कालपासून सुरु होत्या. पण आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून यामागचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. दिव्या खोसलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भूषण कुमरांना अनफॉलो केलं होतं. तसेच तिच्या नावातून कुमार हे आडनाव देखील काढलं होतं. त्याचप्रमाणे तिने टी सिरिजला देखील अनफॉलो केलं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.
परंतु या सगळ्यामागे एक वेगळच कारण असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार दिव्याने तिच्या अकाऊंटवरुन कुमार हे आडनाव काढलं याला ज्योतिषशास्त्रीय कारण असल्याचं समोर आलंय. कारण दिव्याचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यानुसार तिने तिच्या अकाऊंटवर काही बदल केलेत. 21 फेब्रुवारी रोजी तिच्या अकाऊंटमध्ये हे बदल केलेत. दिव्याने अचानक केलेल्या या बदलांमुळे तिच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला. दिव्या आणि भूषण यांच्या लग्नाला तब्बल 19 वर्षे झाली आहेत, त्यामुळे दिव्याने केलेल्या बदलामुळे सोशल मीडियावरील चर्चांना उधाण आलं होतं.
नेमकं कारण काय?
या चर्चांनंतर समोर आलेल्या ZOOM च्या रिपोर्टनुसार, भूषण कुमार आणि टी सिरिजच्या संपूर्ण टीमने या चर्चा साफ खोट्या असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिव्याने हे ज्योतिषीय कारणांमुळे केलं असल्याचं टी सिरिजकडून सांगण्यात आलं आहे. यावर बोलताना टी सिरिजने म्हटलं की, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि लोकांनी त्यांचा आदर केला पाहिजे. तसेच दिव्याने तिच्या अकाऊंटवरील आडनावामध्ये अतिरिक्त S देखील लावला आहे. यामागे देखील ज्योतिषशास्त्रीय कारणांमुळे हे करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.