एक्स्प्लोर

Telly Masala : सागर-मुक्ताची प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार? ते अभिनेता सिद्धार्थनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत घेतली सप्तपदी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : Premachi Goshta Episode Highlights : सागर-मुक्ताची प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार? आदित्यला पुढे करुन सावनी टाकणार पुढचा डाव

प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत सागर मुक्तामधील प्रेमाची गोष्ट सुरु व्हायला लागली आहे. पण सावनी वारंवार त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी सावनी आदित्यचा वापर करतेय. धुळवडीच्या निमित्ताने सागर-मुक्ताच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असतानाच पुन्हा एकदा सावनी आदित्यचा वापर करुन त्यांच्या नात्याचा बेरंग करणार असल्याचं पाहायला मिळतंय. तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

कुठेच चर्चा नाही, कोणाला सांगितलंही नाही; अभिनेता सिद्धार्थनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत घेतली सप्तपदी

 बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठीसह बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल्सने लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता सिद्धार्थ याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) विवाहबंधनात अडकली आहे. अदितीने आपला प्रियकर सिद्धार्थसोबत (Siddharth) विवाह केला आहे. तेलंगणामधील मंदिरात या दोघांनी विवाह केला (Siddharth Aditi Rao Hydari  Wedding) असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाह सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. अदिती आणि सिद्धार्थ यांचा हा दुसरा विवाह आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने काही दिवसापूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू झाली होती. आता सिद्धार्थ आणि अदिती विवाहबंधनात अडकले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aai Kuthe Kay Karte : '12-13 तास सलग रडतेय, त्याचं जाणं स्वीकारावं लागेल...' , आशुतोषसाठी अरुंधतीची भावूक करणारी पोस्ट

मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि मालिकाविश्वात एकाच मालिकेची चर्चा सुरु आहे. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने सध्या बराच मोठा ट्विस्ट घेतला आहे. मालिकेने घेतलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांनी देखील बरीच नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या मालिकेतून आशुतोषची भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धन (Omkar Govardhan) याने मालिकेतून निरोप घेतलाय. त्याच्यासाठी मालिकेतील कलाकारांनी देखील पोस्ट लिहिली होती. त्यावर आता अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने देखील त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीकडून कंगनाचं अभिनंदन, 'विजयभव:' म्हणत शेअर केली पोस्ट

 'लोकसभा निवडणुकां'चं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आणि अनेक नावांच्या चर्चा जोर धरु लागल्या. यामध्ये काही नावं अपेक्षित होती ज्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut), रामायणातील भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट देण्यात आलं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातून तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी मिळाली. दरम्यान कंगनाच्या उमेदवारीनंतर बरीच चर्चा होत आहे. त्यातच एका मराठी अभिनेत्रीनं कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट करत तिचं अभिनंदन केलं असून तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Amit Thackeray on Politics : '...तर राजकारणात आलोच नसतो', अमित ठाकरेंनी राजकारणात येण्याचं स्पष्ट कारणच सांगितलं; तरुण पिढीलाही दिला सल्ला

 अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना यंदाचा झी युवा सन्मान 2024 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह त्यांची आई आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) त्याचप्रमाणे अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाआधी कॉन्टेन्ट क्रिएटर अर्थव सुदामे याने अमित ठाकरे यांची एक मुलाखत घेतली. त्यावेळी अमित ठाकरेने त्यांच्या राजकारणातील करिअरविषयी भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाZero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget