एक्स्प्लोर

Actor Siddharth Wedding : कुठेच चर्चा नाही, कोणाला सांगितलंही नाही; अभिनेता सिद्धार्थनं गुपचूप उरकलं दुसरं लग्न, बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत घेतली सप्तपदी

Siddharth Aditi Rao Hydari Wedding : अभिनेत्री अदिती राव हैदरीने विवाहबंधनात अडकली आहे. अदितीने आपला प्रियकर अभिनेता सिद्धार्थसोबत विवाह केला आहे.

Aditi Rao Hydari  Wedding : बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठीसह बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल्सने लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता सिद्धार्थ याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) विवाहबंधनात अडकली आहे. अदितीने आपला प्रियकर सिद्धार्थसोबत (Siddharth) विवाह केला आहे. तेलंगणामधील मंदिरात या दोघांनी विवाह केला (Siddharth Aditi Rao Hydari  Wedding) असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाह सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. अदिती आणि सिद्धार्थ यांचा हा दुसरा विवाह आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने काही दिवसापूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सुरू झाली होती. आता सिद्धार्थ आणि अदिती विवाहबंधनात अडकले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  मंगळवार 27 मार्च रोजी आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने श्रीरंगापुरममधील श्री रंगनायकस्वामी मंदिरात सप्तपदी घेतल्या. लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, हे दोघेजण आज सायंकाळपर्यंत आपल्या विवाहाची अधिकृतपणे घोषणा करू शकतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

View this post on Instagram
 
A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

आंध्र प्रदेशमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि आदिती यांचे आज तेलंगणातील वानपर्थी जिल्ह्यात असलेल्या श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न झाले. नवविवाहित जोडप्याच्या एका झलकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Siddharth (@worldofsiddharth)

सिद्धार्थ आणि अदिती हे 2021 मध्ये तामिळ-तेलुगू भाषेतील चित्रपट 'महा समुद्रम'च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, या दोघांनी या चर्चांवर भाष्य केले नव्हते. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबतचे नाते मान्य केले होते. 

अदिती आणि सिद्धार्थचा दुसरा विवाह

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांचे हे दुसरे लग्न आहे. अदितीचा पहिला विवाह हा अभिनेता सत्यदिप मिश्रासोबत झाला होता. अदितीचा पहिला विवाह वयाच्या 24 व्या वर्षी झाला होता. मात्र, अदितीने सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यास सुरुवात केल्याने लग्नाची लपवण्यात आली होती. काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतील मेघना नारायण हिच्यासोबत 2003 मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच दोघांमध्ये वाद होई लागल्याने अखेर त्यांनी 2007 मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातही प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget