एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : '12-13 तास सलग रडतेय, त्याचं जाणं स्वीकारावं लागेल...' , आशुतोषसाठी अरुंधतीची भावूक करणारी पोस्ट

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सध्या अनेक ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी नुकतीच अरुंधतीने आशुतोषसाठी एक खास पोस्ट केली आहे.

Aai Kuthe Kay Karte : मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि मालिकाविश्वात एकाच मालिकेची चर्चा सुरु आहे. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने सध्या बराच मोठा ट्विस्ट घेतला आहे. मालिकेने घेतलेल्या या वळणामुळे प्रेक्षकांनी देखील बरीच नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे या मालिकेतून आशुतोषची भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धन (Omkar Govardhan) याने मालिकेतून निरोप घेतलाय. त्याच्यासाठी मालिकेतील कलाकारांनी देखील पोस्ट लिहिली होती. त्यावर आता अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने देखील त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. 

मधुराणीची पोस्ट काय?

मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये. कसं आवडेल. आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे, असं या पोस्टमध्ये मधुराणीने म्हटलं आहे. 

12-13  तास सलग असे काही दिवस रडते आहे - मधुराणी

12/ 13  तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..  काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच... डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात .अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय.ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील.., अशी पोस्ट अरुंधतीने केलीये. 

View this post on Instagram
 
A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

ही बातमी वाचा : 

Amit Thackeray on Politics : '...तर राजकारणात आलोच नसतो', अमित ठाकरेंनी राजकारणात येण्याचं स्पष्ट कारणच सांगितलं; तरुण पिढीलाही दिला सल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget