एक्स्प्लोर

Premachi Goshta Episode Highlights : सागर-मुक्ताची प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार? आदित्यला पुढे करुन सावनी टाकणार पुढचा डाव

Premachi Goshta Episode Highlights : प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Premachi Goshta Episode Highlights : प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत सागर मुक्तामधील प्रेमाची गोष्ट सुरु व्हायला लागली आहे. पण सावनी वारंवार त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी सावनी आदित्यचा वापर करतेय. धुळवडीच्या निमित्ताने सागर-मुक्ताच्या आयुष्यात नवे रंग भरले जात असतानाच पुन्हा एकदा सावनी आदित्यचा वापर करुन त्यांच्या नात्याचा बेरंग करणार असल्याचं पाहायला मिळतंय. तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 

प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या आदित्य मुक्ता आईकडे म्हणजेच माधवी गोखलेंकडे त्याच्या कॉउन्सलिंगसाठी येत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावेळी मुक्ता आदित्यच्या मनात सागरविषयीच्या गोड आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा प्रयत्न करते. पण सावनीला हे कळतं आणि ती आदित्यसमोर मुक्ताचं खरं आणते. त्यामुळे पुन्हा एकदा मुक्ता आदित्यच्या मनातून उतरते आणि तो मुक्ताला काही गोष्टी ऐकवतो. पण कोळी कुटुंबिय मुक्ताला आदित्यला होळीसाठी आणण्याचा आग्रह करतात. 

सागर-मुक्तीची प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार?

दरम्यान होळीला जेव्हा आदित्य येतो तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी सागर मुक्ताला तिच्यावरील प्रेमाची कबुली देतो. त्यावेळी सावनी पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताच्या नात्याविषयी आदित्यच्या मनात विष कालवते. त्यामुळे आदित्य पुन्हा एकदा चिडतो. जेव्हा सागर मुक्ताच्या प्रेमावरची कबुली देते तेव्हा सावनी आदित्यला म्हणते की, तुझा पप्पा विसरला आहे तुला, तो खूश आहे त्याच्या नवीन बायकोसोबत. त्यावर पुन्हा आदित्यला मुक्ताचा राग येतो. 

हे पाहताच आदित्य पार्टीतून बाहेर जातो, पण सागर त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मागे मुक्ताही येते. तेव्हा आदित्य चिडून सागरला म्हणतो की, तुमच्यासाठी महत्त्वाची फक्त आणि फक्त तुमची ती नवीन बायको आहे. त्यावर सागर आदित्यला म्हणतो की, माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस. माझं मुक्तावर अजिबात प्रेम नाही. हे सगळं मागे उभी असलेली मुक्ता ऐकते. ते ऐकून ती सागरच्या कानशिलात लगावते. त्यावर मुक्ता सागरला म्हणते की, मी खरचं या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते. यापुढे सईची आई हे एकच नातं माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. त्यामुळे सावनीमुळे सागर - मुक्ताच्या प्रेमाची गोष्ट सुरु होण्याआधीच संपणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत सुरु होणार प्रेमाचा अध्याय, अर्जुन सायलीला सांगणार का त्याच्या मनातील भावना?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Donald Trump On Bangladesh Crisis : डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray on Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या 'सुखा सुखी' हॉटेलला दिली भेटKaruna Munde On Dhananjay Munde : दिशाभूल करायची आणि वाद पेटवायचा, ही त्यांची योजना- करुणा मुंडेABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMassajog Citizen On Suresh Dhas : सुरेश धस- धनंजय मुंडे भेट, मस्साजोगच्या नागरिकांचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबड युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Donald Trump On Bangladesh Crisis : डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
मुंबईतील 'म्हाडा'च्या कार्यालयात महिला संतप्त; चक्क नोटांची उधळण, अधिकाऱ्याच्या नावानं बोंबाबोंब
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत : सुप्रिया सुळे
Chhaava Movie : 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
Chhaava Movie : 'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
'छावा'मध्ये एक सत्य दाखवलंय, महाराष्ट्राला गद्दारीने कायम...; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Video : जैसा बाप वैसा बेटा! एलाॅन मस्क यांचा चिमुकला मुलगा डोनाल्ड ट्रम्प यांना असं काही म्हणाला की, जगातील सर्वाधिक ताकदीच्या खूर्चीवर बसूनही चेहरा झटक्यात पडला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.