Telly Masala : दोन नव्या मालिका 'झी मराठी'ला तारणार? 'स्टार प्रवाह'वरही आजपासून एक मालिका सुरू होणार ते जय दुधाणे प्रेक्षकांना लावणार 'प्रेमाचं येड'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![Telly Masala : दोन नव्या मालिका 'झी मराठी'ला तारणार? 'स्टार प्रवाह'वरही आजपासून एक मालिका सुरू होणार ते जय दुधाणे प्रेक्षकांना लावणार 'प्रेमाचं येड'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... Telly Masala Marathi Movie Marathi Serial Latest Update Marathi TV serial Zee Marathi Star Pravah Jay Dhudhane Navari Mile Hitlerla and Punha Kartavya Aahe Zee Marathi Serial and Gahroghari Matichya Chuli Star Pravah Serial detail marathi news Telly Masala : दोन नव्या मालिका 'झी मराठी'ला तारणार? 'स्टार प्रवाह'वरही आजपासून एक मालिका सुरू होणार ते जय दुधाणे प्रेक्षकांना लावणार 'प्रेमाचं येड'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/18/07477a458ac58d6eea009c7ca382f61d1710758811542720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi TV Serials Star Pravah vs Zee Marathi : दोन नव्या मालिका 'झी मराठी'ला तारणार? 'स्टार प्रवाह'वरही आजपासून एक मालिका सुरू होणार; प्रेक्षकांचा कौल कोणाला?
छोट्या पडद्यावर टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. मागील अनेक आठवड्यांपासून 'स्टार प्रवाह'ने (Star Pravah) आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर, दुसरीकडे 'झी मराठी'कडून (Zee Marathi) या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजपासून 'झी मराठी'वर (Zee Marathi) दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. तर, दुसरीकडे टस्टार प्रवाहटवर एक नवीन मालिका सुरू होणार आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navari Mile Hitlerla) या मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. तर, घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) ही नवी मालिका सुरू होत आहे. त्यामुळे आता नव्या मालिका प्रेक्षकांना किती भुरळ घालणार याची उत्सुकता लागली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jay Dhudhane : जय दुधाणे प्रेक्षकांना लावणार 'प्रेमाचं येड', स्टार प्रवाहच्या मालिकेतून छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री, साकारणार ही भूमिका?
नव्या मालिकांच्या प्रवाहामध्ये स्टार प्रवाहने (Star Pravah) त्यांच्या तिसऱ्या नव्या मालिकेची घोषण केलीये. स्टार प्रवाहकडून नुकतच या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. येड प्रेमाचं लागलं (Yed Lagla Premacha) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून विशाल निकम (Vishal Nikam) आणि पूजा बिरारी (Pooja Birari) ही नवी जोडी झळकणार आहे. तसेच या मालिकेत बिग बॉस सिजन 2 फेम जय दुधाणे (Jay Dhudhane) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आलीये.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mumbai Indians : 'होम मिनिस्टर'मध्ये छोटे भाऊजी, मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड झळकणार आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात?
आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाचं वीसावं वर्ष सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. आता झी मराठीच्या (Zee Marathi) या बहुचर्चित कार्यक्रमात मुंबई इंडियन्स टीमचा (Mumbai Indians) टीम डेव्हिड (Tim David ) झळकणार असल्याची चर्चा आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Balumama : सुमित पुसावळेने 'बाळूमामा' मालिका का सोडली? समोर आलं कारण
'बाळूमामा' (Balumama) या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे (Sumit Pusavale) आता 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तो 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. सुमितने 'बाळूमामा' सोडल्यानंतर त्याने ही मालिका का सोडली असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता नव्या मालिकेसाठी त्याने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
'पुष्पा 2'संदर्भात मोठी अपडेट समोर; अल्लू अर्जुनचा आवाज बदलणार? श्रेयस तळपदे म्हणाला...
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'पुष्पा'चा (Pushpa) पहिला भाग हिंदी पट्ट्यात चांगलाच चालला. हिंदी वर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने (Shreyas Talpade) आवाज दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)