एक्स्प्लोर

Telly Masala : शाहरुख खान उपचारासाठी तातडीने अमेरिकेला जाणार ते ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर काय पाहाल? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

 

Shahrukh Khan Health Updates :  शाहरुख खानला मोतीबिंदू? किंग खानच्या डोळ्याला नेमकं झालंय काय? समोर आली महत्त्वाची अपडेट...

Shahrukh Khan Health Updates :  बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला (Shahrukh Khan) तातडीने अमेरिकेला रवाना होणार आहे. मुंबईत उपचारादरम्यान काही समस्याच उद्भवल्याने शाहरुख आता उपचारासाठी अमेरिका गाठणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख हा मंगळवारीच अमेरिकेला रवाना होणार आहे. शाहरुखच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानला मोतीबिंदू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

 

OTT Release in August :  क्राईम-थ्रिलर कॉमेडी, ऑगस्टमध्ये ओटीटीवर धमाका; रिलीज होणार हे वेब सीरिज-चित्रपट

OTT Release in August :  ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा (OTT Release in Month Of August) धमाका होणार आहे. पुढील महिन्यात लाँग वीकेंडही आहे आणि ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. क्राईम, थ्रिलर, कॉमेडी जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे. यातील काही चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत धोका सूरज चव्हाणनं एका दिवसाच्या कमाईचा आकडा सांगितला; कलाकारांच्या भुवयाच उंचावल्या...


Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan :  यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच 16 स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मराठी-हिंदी इंडस्ट्री, रिएल्टी शो गाजवणाऱ्या कलाकारांपासून ते रील स्टार्सही बिग बॉसच्या घरात आहेत. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांचे नजरा खिळल्या आहेत. सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना आपल्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितले. सूरजने आपल्या कमाईबाबत सांगितल्यानंतर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Marathi Season 5 Day 2 : प्रेमात असं चालतंय बिग बॉस!दुसऱ्याच दिवशी घरात वाहू लागलेत प्रेमाचे वारे, छोट्या पुढारीने थेट...

Bigg Boss Marathi Season 5 Day 2 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची (Bigg Boss Marathi New Season) थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात जोडी जमणे ही फारशी नवीन बाब नाही. यंदाच्या सीझनमध्ये कोणाची जोडी जमणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता, घरातील प्रेमाचे वारे वाहू लागले असल्याचे समोर आले आहे. घरातील सदस्य असलेला छोटा पुढारी घन:श्याम दराडेने थेट आता हिंटच दिली आहे. घन:श्यामच्या बोलण्यावर घरातील सदस्यही थट्टा मस्करीच्या मूडमध्ये दिसले.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi Season 5 : कोकण हार्टेड गर्लच्या 'त्या' प्रतिक्रियेवर निक्कीची सटकली; म्हणाली, 'वेळ आल्यावर बरोबर...', नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) नवा सिझन 28 जुलै पासून सुरु झाला. पण घरात पहिल्याच दिवसापासून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळतंय. निक्कीचा (Nikki Tamboli) आधी वर्षा उसगांवकरांसोबत (Varsha Usgaonkar) आणि आता अंकितासोबत (Ankita Prabhu Walavalkar) वाद होता होता राहिला. त्याबद्दल ती जान्हवी किल्लेकर हिच्यावजळ बोलत होती. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना पहिल्याच दिवशी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यादरम्यान अनेकांना एकमेकांचं वागणं खटकलं असून आता त्यावर राडा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Story : नशिबानं सूरज चव्हाणला दिलेला 'गुलिगत धोका'; कॅन्सरनं वडिलांना गमावलं, आई अन् आजीला परिस्थितीनं हिरावलं

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan Family Story :  यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच 16 स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर (Suraj Chavan) सगळ्यांची नजर खिळली आहे. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरातील लोकांसोबत बोलताना सूरजने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Salman Khan : जेव्हा सलमान खानने वाचवले चिमुरडीचे प्राण, भाईजाननं केलं बोन मॅरो दान, जाणून घ्या संपूर्ण कहाणी


मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) एक असा अभिनेता आहे जो केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर त्याच्या औदार्यासाठी देखील ओळखला जातो. भाईजान नेहमीच अनेकांचा मदत करताना पाहायला मिळतो. सलमानने एका चिमुकलीचा जीवही वाचवला आहे. सलमान खानने अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो दान करून एका लहान मुलीचा जीव वाचवला होता.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Premachi Goshta : मिहिका अडकली हर्षवर्धनच्या जाळ्यात, मिहिरची अवस्था पाहून इंद्राचा संताप; मुक्ता-सागर लावणार का सत्याचा शोध? 

Premachi Goshta : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका बरीच रंजक वळणावर आहे. मिहिकाने अचानक हर्षवर्धनसोबत लग्न केल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मुक्ता जेव्हा तिला समजावते तेव्हाही मिहिका तिच्याशी उद्धटपणे बोलते. त्यामुळे सागर आणि मुक्ता तिच्यावर खूप चिडतात. पण मिहिका हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकली असल्याचा ठाम विश्वास मुक्ता व्यक्त करते. दुसरीकडे मिहिर मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ असतो. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget