एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत धोका सूरज चव्हाणनं एका दिवसाच्या कमाईचा आकडा सांगितला; कलाकारांच्या भुवयाच उंचावल्या...

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना आपल्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितले. सूरजने आपल्या कमाईबाबत सांगितल्यानंतर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan :  यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच 16 स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मराठी-हिंदी इंडस्ट्री, रिएल्टी शो गाजवणाऱ्या कलाकारांपासून ते रील स्टार्सही बिग बॉसच्या घरात आहेत. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांचे नजरा खिळल्या आहेत. सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना आपल्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितले. सूरजने आपल्या कमाईबाबत सांगितल्यानंतर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

बिग बॉसच्या घरातील सुरुवातच आव्हानांपासून झाली. घरात पाणी नसण्यापासून नाश्तादेखील देण्यात आला नव्हता. या दरम्यानच्या मोकळ्या वेळेत स्पर्धक एकमेकांशी संवाद साधताना दिसले. एकमेकांशी आणखी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत होते. त्यावेळी सूरजने आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.  

टिक टॉक या शॉर्ट व्हिडीओ अॅपमुळे सूरज चांगलाच प्रसिद्धीच्या झोकात आला होता. टॉप व्हिडीओ क्रिएटरपैकी सूरज होता. सूरज भोवती प्रसिद्धीचे वलय चांगलेच होते. त्यावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी,  उद्घाटन करण्यासाठी रिबीन कापण्यासाठी 80 हजार रुपये मिळायचे असे सूरजने सांगितले.त्यावेळी माझी लोकांनी फसवणूक केली असल्याचे सूरजने सांगितले. आताही मला एका दिवसाचे 30 ते 50 हजार मिळत असल्याचे सूरजने सांगितले. सूरजच्या मानधनाचा आकडा ऐकताच इतरांच्या भुवयाच उंचावल्या. 

खूप फसवणूक झालीय...

सूरजने सांगितले की, याआधी माझी खूप फसवणूक झाली आहे. त्यामुळे माझ्या बहिणींना खूपच काळजी वाटते असे त्याने सांगितले. तू फक्त सुधार आम्हाला खूप बरं वाटेल असे बहिणींनी सांगितले असल्याचे सूरजने सांगितले. 

'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलिगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला.  पण असे असले तरी सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  बारामतीमधील या रील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Embed widget