एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : कोकण हार्टेड गर्लच्या 'त्या' प्रतिक्रियेवर निक्कीची सटकली; म्हणाली, 'वेळ आल्यावर बरोबर...', नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांच्यामध्ये आता वादाची ठिणगी पडली असून या दोघांमध्ये राडा होणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) नवा सिझन 28 जुलै पासून सुरु झाला. पण घरात पहिल्याच दिवसापासून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळतंय. निक्कीचा (Nikki Tamboli) आधी वर्षा उसगांवकरांसोबत (Varsha Usgaonkar) आणि आता अंकितासोबत (Ankita Prabhu Walavalkar) वाद होता होता राहिला. त्याबद्दल ती जान्हवी किल्लेकर हिच्यावजळ बोलत होती. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना पहिल्याच दिवशी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यादरम्यान अनेकांना एकमेकांचं वागणं खटकलं असून आता त्यावर राडा होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

अंकिता आणि योगिता किचनमध्ये भांडी घासत असताना निक्की जान्हवीला हे सगळं सांगत असते. त्यावेळी निक्कीचा रोख हा अंकितावर होता. त्यामुळे आता निक्की आणि अंकितामध्ये लवकरच मोठा राडा होणार असल्याचं पाहायला मिळेल. पण अंकिताला ही गोष्ट कळल्यावर अंकिता काय करणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. 

नेमकं काय घडलं?

निक्की जान्हवीला सांगते की, निखिलने मला सांगितलं की, जर तिचा सावरडो ब्रेड आला आहे तर तुझंही किनोव्हा येईल. तेव्हा निक्कीने बाहेर भांडी घासत असलेल्या अंकिताकडे बोट केलं आणि म्हणाली की तिने वाकडं तोंड केलं. हे मी त्या आरशात पाहिलं. माझी तेव्हा खूप सटकली होती. कारण भूक खूप लागली होती, त्यामुळे मी आधीच वैतागले होते. कारण तिकडे काहीतरी  सुरु होतं आणि मला ते वातावरण खराब नव्हतं करायचं. पण वेळ आल्यावर बोलेन मी.छोट्या छोट्या गोष्टीवरुन मला वाद करायचा नाही. कारण माझा वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो. त्यामुळे निक्की आणि अंकितामध्ये आता वादाची ठिणगी पेटली असल्याचं पाहायला मिळतंय. 

बिग बॉसच्या घरात खाण्यासाठी आणि पिण्यासाठी संघर्ष

बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी घरातलं पाणी गेलं. त्यानंतर लॅविश ब्रेकफास्ट आयोजित करुनही स्पर्धकांना त्याचा आस्वाद घेता नाही आला. त्यासाठी घरातल्या स्पर्धकांना ज्यांच्याकडे निर्णयक्षमता नाही, अशा तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगितलं. तेव्हा घरातल्यांनी सूरज चव्हाण, इरीना आणि धनंजयला नॉमिनेट केलं. आता हे तिघं मिळून घरातल्यांसाठी काही वस्तू आणतात. त्यावरुन घरात काय राडा होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत धोका सूरज चव्हाणनं एका दिवसाच्या कमाईचा आकडा सांगितला; कलाकारांच्या भुवयाच उंचावल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani : परभणीत Somnath Suryavanshi यांचा मृतदेह दाखल, अंत्यसंस्कारही परभणीतच होणारManoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
Embed widget