Salman Khan : जेव्हा सलमान खानने वाचवले चिमुरडीचे प्राण, भाईजाननं केलं बोन मॅरो दान, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
Salman Khan : अभिनेता सलमान खानने अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो दान करून एका लहान मुलीचा जीव वाचवला होता.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) एक असा अभिनेता आहे जो केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर त्याच्या औदार्यासाठी देखील ओळखला जातो. भाईजान नेहमीच अनेकांचा मदत करताना पाहायला मिळतो. सलमानने एका चिमुकलीचा जीवही वाचवला आहे. सलमान खानने अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो दान करून एका लहान मुलीचा जीव वाचवला होता.
जेव्हा सलमान खानने वाचवले चिमुरडीचे प्राण
ही घटना 2010 मधील आहे. एका पूजा नावाच्या चिमुरडीला बोन मॅरोची गरज होती. बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालं तरच ती जगू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी सलमान खान हा एकमेव अभिनेता होता जो मदतीसाठी पुढे आला होता. सलमान खानने बोन मॅरो दान करत चिमुकलीला जीवदान दिलं होतं.
चिमुरडीच्या मदतीला धावला भाईजान
सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काही वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओमध्ये सलमान एका चिमुकलीसाठी आपला बोन मॅरो दान करण्याबाबत बोलताना दिसत आहे. भाईजानने बोन मॅरो दान केलं, ज्या बोन मॅरो मदतीनेच ब्लड कॅन्सरने पीडित मुलीला वाचवण्यात यश आलं. बोन मॅरो दान करणारा सलमान खान पहिला भारतीय आहे.
सलमान खानने बोन मॅरो केलं दान
सोशल मीडियावर चर्चेत असलेला सलमान खानचा व्हिडीओ 2010 मधील आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. जिथे एका महिलेने सलमानला भेटायला आलेल्या लोकांना विनंती केली की, त्यांनी जाऊन बोन मॅरो दानासाठी नोंदणी करून घ्यावी. या महिलेची मुलगी एका गंभीर आजाराने त्रस्त आहे, ज्याचा उपचार केवळ बोन मॅरोद्वारे होऊ शकतो. तेव्हा सलमाननं महिलेला सांगितलं की, जर त्याचा बोन मॅरो त्या मुलीला उपयोगी पडला तर तो दान करण्यास तयार आहे. दरम्यान, त्या मुलीशी सलमानची बोन मॅरो जुळला की नाही हे कळू शकलेलं नाही.
सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
यानंतर पूजा नावाच्या चिमुरडीला उपचारासाठी बोन मॅरोची गरज असल्याचं सलमानला समजलं. तेव्हा सलमानची फुटबॉल टीम असायची. सलमानने त्याच्या फुटबॉल टीमसोबत बोन मॅरो दान करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या फुटबॉल संघातील सदस्यांनी पाठ फिरवली. अशा वेळी, सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज यांनी बोन मॅरो दान करून मुलीचे प्राण वाचवले. MDRI (मॅरो डोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया) सदस्य डॉ. सुनील पारेख यांनी सलमानच्या बोन मॅरो दानाची पुष्टी केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :