एक्स्प्लोर

Telly Masala : 'अशी ही बनवाबनवीच'च्या सिक्वेलवर सचिन पिळगावकरांचे भाष्य ते करण जौहरच्या 'एक फुल अन् एक हाफ' प्रेमाची गोष्ट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Wari : ''संतांनी असंच 'टाईमपास' म्हणून वारी...'' अभिनेता किरण मानेंची पोस्ट चर्चेत, ''हा खतरनाक विद्रोह...''

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Wari :  अनेक अभिनेते कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. चाहत्यांसोबत संवाद साधण्यासह आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात.  फार कमी  कलाकार सामाजिक-राजकीय मुद्यावर भाष्य करतात. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर नेहमी सामाजिक-राजकीय भाष्य करणाऱ्या पोस्ट करत असतात. किरण माने यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वारीबाबत भाष्य केले आहे. वारी ही संतानी सुरू केलेला एक खतरनाक विद्रोहच होता असे किरण माने यांनी म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : 'अशी ही बनवाबनवी-2' येणार? सचिन पिळगावकर यांनी स्पष्टच सांगितले, ''हा चित्रपट...''

Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या चित्रपटांचा सिक्वेल येत असतो. सिक्वेलची ही बाब सिनेसृष्टीत  फारशी नवी नाही. मराठीतही काही चित्रपटांचे सिक्वेल झाले आहेत.  मराठी सिनेसृष्टीत काही एव्हरग्रीन चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई  केली आहेच, शिवाय आजही हे चित्रपट पाहताना धमाल येते. अशा काही चित्रपटांच्या सिक्वेलची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' ( Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू असते. आता, यावर दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी भाष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Javed Akhtar : 'पाकिस्तान बनवण्यात तुमच्या वडिलांचं योगदान,' धर्माच्या मुद्द्यावरुन जावेद अख्तरांचं सोशल मीडियावर ट्रोलिंग;संतप्त होत म्हणाले...

Javed Akhtar :  'शोले', 'दीवार', 'जंजीर' सारख्या चित्रपटांचं लेखन करणारे जावदे अख्तर (Javed Akhtar) हे हिंदी सिनेसृष्टीमधलं एक मोठं नाव आहे. दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस अशी गाणी दिलीत. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही हे नाव फार आवडीचं झालं. पण सध्या सोशल मीडियावर जावेद अख्तर हे बरेच भडकले असल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Karan Johar : करण जौहरच्या 'एक फुल अन् एक हाफ' प्रेमाची गोष्ट; वयाच्या पन्नाशीतही सिंगल असण्याचं कारणही सांगितलं 

Karan Johar : बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर (Karan Johar) हा कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. करण हा वयाच्या 50 व्या वर्षातही सिंगल असून तो सिंगल फादरचीही भूमिका निभावत आहे. पण करणने अजूनही लग्न का केलं नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना कायमच पडत असतो. याच प्रश्नाचं उत्तर करणने दिलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Wild Wild Punjab Review : हृदयाच्या जखमेवर मनोरंजनाची सुखकारक फुंकर

Wild Wild Punjab Review : तुमचे हृदय कधीतरी तुटले असेल, तुम्ही तुमच्या हृदयाच्या दुखण्यावर इलाज शोधत आहात आणि  तुम्ही सोशल मीडियावर दुःखी रिल्स पहात आहात, आणि तेच तुमच्या फीडमध्ये येत आहेत. तुम्हाला खूपच उदास वाटत असेल, कंटाळा आला असेल तर  तुम्ही हा वाइल्ड वाइल्ड पंजाब चित्रपट पाहू शकता.  या चित्रपटांमुळे मनाच्या वेदनांवर मजेदार पद्धतीने उपचार होतील आणि चांगले मनोरंजनही होईल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Movies : शिवाजी पार्कात खळबळ! फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता चढला झाडावर; थेट मोदींनाच आवाहन; प्रकरण काय?

Marathi Movie Producer : मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील एका झाडावर चढून चित्रपट निर्मात्याने आंदोलन सुरू केले आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (AWBI) सुरू असलेल्या जाचक वसुलींच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रविणकुमार मोहरे असे या निर्मात्याचे नाव आहे. आपली सुटका करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास गळफास घेऊ  अशी धमकी त्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलीस, अग्निशमक दलाच्या जवानांना दिली आहे. छत्रपती शिवाजी पार्कमध्ये अचानकपणे हे आंदोलन सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Movie Yere Yere Paisa 3 : संजय जाधव यांच्या चित्रपटात झळकणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्री; उमेश कामत, तेजस्विनी पंडितचीही भूमिका

Marathi Movie Yere Yere Paisa 3 : दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी  "ये रे ये रे पैसा 3" या चित्रपटात आणखी काही नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे.  "ये रे ये रे पैसा 3" या चित्रपटाचा मुहूर्त आज सकाळी मुंबईत पार पडला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदींच्याही  भूमिका आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget