एक्स्प्लोर

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Wari : ''संतांनी असंच 'टाईमपास' म्हणून वारी...'' अभिनेता किरण मानेंची पोस्ट चर्चेत, ''हा खतरनाक विद्रोह...''

Ashadhi Ekadashi Wari : किरण माने यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वारीबाबत भाष्य केले आहे.

Kiran Mane On Ashadhi Ekadashi Wari :  अनेक अभिनेते कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. चाहत्यांसोबत संवाद साधण्यासह आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात.  फार कमी  कलाकार सामाजिक-राजकीय मुद्यावर भाष्य करतात. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर नेहमी सामाजिक-राजकीय भाष्य करणाऱ्या पोस्ट करत असतात. किरण माने यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वारीबाबत भाष्य केले आहे. वारी ही संतानी सुरू केलेला एक खतरनाक विद्रोहच होता असे किरण माने यांनी म्हटले. 

अभिनेता किरण माने हे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत. किरण माने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सामाजिक राजकीय मुद्यावर भाष्य करतात. किरण माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले की, 'वारी' ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच 'टाईमपास' म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो,''असे किरण माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले. 

किरण माने यांनी काय म्हटले?

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, ...याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.

...विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही 'अदा' होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात !! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी 'मेसेज' द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.  ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला 'भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला... तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर 'आपलंच' डोकं आहे...असेही किरण माने यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget