Javed Akhtar : 'पाकिस्तान बनवण्यात तुमच्या वडिलांचं योगदान,' धर्माच्या मुद्द्यावरुन जावेद अख्तरांचं सोशल मीडियावर ट्रोलिंग;संतप्त होत म्हणाले...
Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या एका पोस्टमुळे त्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमुळे त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.
Javed Akhtar : 'शोले', 'दीवार', 'जंजीर' सारख्या चित्रपटांचं लेखन करणारे जावदे अख्तर (Javed Akhtar) हे हिंदी सिनेसृष्टीमधलं एक मोठं नाव आहे. दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस अशी गाणी दिलीत. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही हे नाव फार आवडीचं झालं. पण सध्या सोशल मीडियावर जावेद अख्तर हे बरेच भडकले असल्याचं पाहायला मिळतंय.
सोशल मीडियावर अमेरिकेच्या निवडणूकीवरुन जावेद अख्तर यांनी एक पोस्ट केली. त्या पोस्टवरुन जावेद अख्तर यांना ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर जावेद अख्तर यांनीही जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. कारण या ट्रोलर्सनी त्यांच्या वडिलांच्या देशभक्तीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
जावेद अख्तर यांची पोस्ट नेमकी काय होती?
जावेद अख्तर यांनी अमेरिकेच्या निवडणुकांवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एक अभिमानी भारतीयच आहे आणि कायमच राहिन. पण जो बायडन आणि माझ्यामध्ये मला एक कॉमन फॅक्टर दिसत हे. त्यामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी आम्हा दोघांना समान संधी आहे.
जावेद अख्तर ट्रोल
जावेद अख्तर यांनी ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं बरंच ट्रोलिंग करण्यात आलं. एका युजरने म्हटलं की, पाकिस्तान बनवण्यात तुमच्या वडिलांचं मोठं योगदान होतं. इतकंच नव्हे तर या ट्रोलरने जावेद अख्तर यांना गद्दारचा मुलगा असंही म्हटलं आहे. युजरच्या या उत्तरावर जावेद अख्तरही चांगलेच भडकले आणि त्यांनी जशास तसं उत्तरही दिलं.
जावेद अख्तरांचं सणसणीत उत्तर
जावेद अख्तर यांनी या कमेंटवर उत्तर देत म्हटलं की, 'मला नाही माहित तू अज्ञानी आहेस की पूर्णपणे बावळट आहेस. माझं कुटुंब हे 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा भाग होतं आणि त्यासाठी त्यांनी तुरूंगास आणि काळ्या पाण्याची शिक्षा देखील भोगली आहे. पण अशी पूर्ण शक्यता आहे की तेव्हा तुझे वडील किंवा आजोबा हे इंग्रजांची बूट चाटत असतील.'
बरं ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'त्यांच्या कोणत्या पूर्वजांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली? त्यावर उत्तर देत जावेद अख्तर यांनी म्हटलं की, माझा पणजोबा फजले हक खैराबादी यांना 1859 मध्ये कलकत्ता येथून फायर क्वीन नावाच्या जाहजातून अंदमानला पाठवण्यात आलं होतं. तिथे त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे, बागी हिंदुस्तान. आता हे पुस्तक इंग्रजीत देखील भाषांतरित केलं जातंय. त्यांच्याविषयी तुम्ही गुगल करु शकता.'
I am a proud Indian citizen and till my last breath I will remain so but I have one common fact with Joe Biden . Both of us have exactly equal chance of becoming the next president of USA .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 6, 2024