एक्स्प्लोर
Advertisement
43 लाखांच्या नव्या नोटांसह टीव्ही अभिनेता पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली: सत्य घटनेवर आधारित टीव्ही मालिका क्राईम पेट्रोलमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता राहुल चेलानीला होशंगाबाद पोलिसांनी 43 लाख 60 हजारांच्या नव्या नोटांसह पकडलं आहे. राहुल नव्या नोटा घेऊन इटारसीवरुन होशंगाबादला येत होता.
राहुल टीव्ही मालिकेत काम करत असताना सोबतच रिअल इस्टेटचा व्यापारही करतो. राहुल अनेक मालिकांमध्ये कामं करतो. पोलिसांनी राहुलकडून 2 हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांसह इनोव्हा कारही जप्त केली आहे. ज्या कारवरक 'प्रेसिडंट अॅण्टी करप्शन सोसायटी' अशी पाटी आहे.
कार जप्त करुन पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्यामध्ये राहुल हा त्यांचा प्रमुख असल्याचं समजतं आहे. राहुल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचं काम करत होता.
हे पैसे आपलेच असल्याचा दावा राहुलनं केला आहे. जे आपण मालिका आणि आपल्या व्यवसायातून कमावले असल्याचा त्यानं दावा केला आहे. राहुलच्या मते, हे पैसे तो आपल्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या मामांकडे ठेवण्यासाठी घेऊन जात होता. पण एवढे पैसे एकाचवेळी राहुलकडे आले कुठून हा प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करीत असून नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच यासंबंधी पोलिसांनी आयकर विभागालाही माहिती दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement