(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Serial : अधितपीकडूनच अक्षराचा सर्वात मोठा विश्वासघात, भुवनेश्वरीच्या प्लॅनमध्ये सहभाग; आता नेमकं कोणतं वळण येणार?
Marathi Serial : तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर असून अधितपीकडूनच अक्षराचा सर्वात मोठा विश्वासघात झाला आहे.
Marathi Serial : 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. भुवनेश्वरी की चारुलता हा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून जसा अक्षराला पडला आहे, तसाच तो प्रेक्षकांनाही पडलाय. पण अखेर या प्रश्नांचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. पण हे उत्तर मिळतानाच अक्षराला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्काही बसलाय. कारण चारुलता नसून भुवनेश्वरीच असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येतं. पण भुवनेश्वरीच्या याच प्लॅनमध्ये अधिपतीचा देखील सहभाग असल्याचा मोठा धक्का अक्षराला बसतो.
झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा भुवनेश्वरीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यात अखेर यशस्वी होतेच. पण यावेळी अधिपती एक मोठा खुलासा करतो, ज्याचा धक्का अक्षराला बसतो. भुवनेश्वरीने फसवणूक केली म्हणून अक्षरा पोलिसांना बोलवण्याची भाषा करते, पण त्याचवेळी अधिपती देखील या प्लॅनमध्ये सहभागी असल्याचं अक्षराला कळतं.
मालिकेचा नवा प्रोमो समोर
भुवनेश्वरीने केलेल्या फसवणुकीवरुन अक्षरा अधिपतीला म्हणते की, तुमच्या अपराधी आहेत त्या..गुन्हा केलाय त्यांनी..तुमची फसवणुक झालीये... मुलगा मानतात त्या तुम्हाला मग त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? त्यावर अधितपती अक्षराला म्हणतो की, त्यांनी त्यांच्या डोक्यातला विचार मला बोलून दाखवला होता...फसवणुकीचा गुन्हा तुम्हाला दाखल करायचा असेल तर आमच्या दोघांवर तो गुन्हा दाखल करा...त्यांच्या एकट्यावर नाही...गुन्हेगार फक्त त्या नाही आम्ही पण आहोत...
तगडी स्टारकास्ट असलेली मालिका
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं स्टारकास्ट खूपच तगडं आहे. हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले मध्यवर्ती भूमिकेत आहेत. मधुगंधा कुलकर्णी यांनी या मालिकेचं लेखन केलं असून शर्मिष्ठा राऊतने या मालिकेची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram