एक्स्प्लोर

Tuja Maja Sapan : पैलवान प्राजक्ता पुन्हा उतरणार कुस्तीच्या आखाड्यात; 'तुजं माजं सपान' मालिकेचा रंगणार विशेष भाग

Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे.

Tuja Maja Sapan Marathi Serial Latest Update : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात पैलवान प्राजक्ता पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरलेली पाहायला मिळेल. या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे.

एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे 'तुजं माजं सपान' ही मालिका होय. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथ, या मालिकेला उजवं ठरवते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

क्षेत्र मग ते कुठलंही असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्यं यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. हीच बाब वेटक्लाउड या निर्मितिसंस्थेची सोनी मराठी वाहिनीवरील 'तुजं माजं सपान' ही मालिका अधोरेखित करते आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पहिलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा प्रेक्षकांना 'तुजं माजं सपान' या मालिकेत पाहायला मिळत आहे.

वीरूसंगे प्राजक्ताच्या पैलवानकीचा प्रवास सुरू!

वीरू पहिलवानासोबत लग्न करून शिराळकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करणारी प्राजक्ता लग्नानंतर आपल्या स्वप्नांना विसरून संसारात रमली खरी, पण तिचं स्वप्न तिच्यापेक्षा जास्त वीरूला छळतंय. संसाराच्या गाड्यला जुंपून न घेता कुस्तीगीर बनण्याचं आपलं स्वप्न प्राजक्तानं पूर्ण करावं त्यासाठी एक नवरा म्हणून तसेच एक नामांकित कुस्तीगीर म्हणून वीरू आपल्यापरीने प्राजक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतोय.

'तुजं माजं सपान' मालिकेचा रंगणार विशेष भाग

आपल्या आईच्या जुनाट विचारांना न जुमानता,  आईच्या रोषाला सामोरं जाऊन वीरू प्राजक्ताला कुस्ती खेळण्याचं आव्हान देतो. तिच्या पैलवानकीच्या प्रवासात साथ देण्याचं वचनही देतो, पण प्राजक्ता वीरूचं मन राखू शकेल का..? वीरू प्राजक्ताला पुन्हा तालमीत आणू शकेल का..? समाजानं बांधून दिलेल्या चौकटीत प्राजक्ता आपल्या स्वप्नांना तिलांजली देईल की वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल..? तुमच्याही मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं असेल, हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेचा विशेष महाएपिसोड 29 ऑक्टोबर रोजी संद्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. 

संंबंधित बातम्या

Tuja Maja Sapan : होणार दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात; 'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget