एक्स्प्लोर

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: आरक्षित जागेवरून झालेल्या वादादरम्यान तिनं स्वतःचे कपडे काढले आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्यावर रेझर ब्लेडनं हल्ला केला, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. 

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: प्रसिद्ध मॉडल आणि गाजलेल्या वेब सीरिजमध्ये (Web Series) झळकलेली अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (Actress Antara Banerjee) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तर, तिनं केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे तिला अटकही करण्यात आली आहे.  आरक्षित जागेवरून झालेल्या वादादरम्यान तिनं स्वतःचे कपडे काढले आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका अधिकाऱ्यावर रेझर ब्लेडनं हल्ला केला, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली, जेव्हा अंतरा एका वेब सीरिजच्या शुटिंगसाठी वांद्रे-गंगानगर अरावली एक्सप्रेसनं सुरतला जात होती.

अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (Antara Banerjee) एका शूटिंगसाठी सुरतला जात होती, तिच्याकडे केवळ 'स्लीपर क्लास'चं तिकीट असतानाही ती आरक्षित 'एसी' (AC) डब्यात शिरली होती. ही घटना बोरीवली आणि डहाणू दरम्यान रात्री 9.30 ते 10.50 च्या सुमारास घडली. एफआयआरनुसार (FIR), एका प्रवाशाने बॅनर्जीला ती आरक्षित जागा रिकामी करण्यास सांगितलं. तिनं नकार दिल्यावर, त्या प्रवाशानं टीसी हरिकेश त्रिपाठी आणि आरपीएफला याची माहिती दिली. 

अभिनेत्रीचं टीसी, RPF जवानासोबत अरेरावी (Actress Behaves Rudely With TC And RPF Officer)

RPF चे सहाय्यक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांनी आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण अंतरा बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन केलं आणि त्यानंतर त्या आक्रमक झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्यांनी स्वतःचे कपडे काढले, ब्लेड बाहेर काढलं आणि मिश्रा तसेच स्वतःलाही जखमी केलं. मिश्रा यांचा आरोप आहे की, अभिनेत्रीनं त्यांचा गणवेश आणि मोबाईल फोनचेही नुकसान केलं.

Antara Banerjee Controversy | TV Actress Attacks RPF Jawan in Train

रेल्वे कोचचे दरवाजेही केले बंद (Actress Antara Banerjee Attacking On TC)

परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आरपीएफच्या जवानांनी एसी कोचचे दरवाजे बंद केले. डहाणू रेल्वे स्थानकावर खाली उतरवून सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात देण्यापूर्वी, अंतरा बॅनर्जी यांनी पळून जाण्यासाठी खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. ही घटना एका तासाहून अधिक काळ चालली, ज्यामुळे रेल्वे कोचमध्ये उपस्थित प्रवाशांमध्येही भितीचं वातावरण पसरलं होतं.

अभिनेत्रीची पोलिस कोठडीत रवानगी

दुसऱ्या दिवशी सकाळी, बोरीवली रेल्वे पोलिसांनी बॅनर्जी यांना ताब्यात घेतलं. बोरीवली जीआरपीच्या (GRP) निरीक्षक कुंदा गावडे यांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, AC डब्याचं तिकीट न मिळाल्यामुळे त्या कदाचित अस्वस्थ किंवा संतापलेल्या असाव्यात. जेव्हा त्यांना नातेवाईकांशी किंवा वकिलाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं, तेव्हा बॅनर्जी यांनी तसं करण्यास नकार दिला आणि स्वतःला अटक करण्याची मागणी केली. बोरीवली जीआरपी निरीक्षक गावडे म्हणाल्या की, "एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर त्या शांत झाल्या..."

गुन्हा दाखल आणि जामिनावर सुटका 

13 ऑगस्ट रोजी नोंदवण्यात आलेल्या FIR मध्ये बॅनर्जी यांना आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं. सुरक्षितता धोक्यात आणणं, सरकारी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत पोहोचवणं, हल्ला करणं आणि जाणीवपूर्वक अपमान करणं या आरोपांखाली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget