TRP List : टीआरपी लिस्टमध्ये 'बिग बॉस 18' टॉप 5 च्या बाहेर, अनुपमा 'नंबर 1'; दुसऱ्या क्रमांकावर 'या' शोची बाजी
TRP Ranking This Week Top 5 TV Show : टी आरपी लिस्टमध्ये अनुपमा मालिका पहिल्या क्रमाकांवर आहे, तर 'बिग बॉस 18' टॉप 5 च्या बाहेर आहे.
TRP List This Week : छोट्या पडद्यावर विविध मालिका सुरु आहेत. काहींना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे, तर काही मालिकांना खास प्रेक्षकवर्ग मिळवता आलेला नाही. टीव्ही मालिकांचं या आठवड्याच रँकिंग समोर आलं आहे. टीआरपी लिस्टमध्ये कोणत्या मालिकांचा समावेश आहे, टॉप 5 मालिकांमध्ये कोणत्या टीव्ही शोने स्थान मिळवलं आहे आणि कोणत्या शोला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे, हे स्पष्ट होतं. यामध्ये अनुपमा मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मनोरंजनाचा 'बॉस' समजला जाणारा बिग बॉस शो मात्र टॉप 5 लिस्टच्या बाहेर आहे. सलमान खानच्या शोला टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.
अनुपमा शो शर्यतीत अव्वल
टीआरपी लिस्टमध्ये सलमान खानच्या बिग बॉस शो टॉप 5 मध्येही सामील नाही. राजन शाही यांची अनुपमा टीव्ही शो मागील काही आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून बसला आहे. या मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत असून यातील कलाकारांनानी लोकांचं खूप प्रेम मिळत आहे. याचाच परिणाम टीआरपी रेटिंगमध्येही दिसून येत आहे. अनुपमा शो या आठवड्यातही टीआरपी रेटिंग लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. या शोमधील ट्विस्ट आणि टर्नमुळे प्रेक्षकांसाठी ही मालिका फारच रंजक बनली आहे. या शोच्या बदललेल्या कहाणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. यामुळेच या शोला या आठवड्यात 2.4 टीआरपी रेटिंग मिळाली आहे.
ये रिश्ता क्या कहलाता हैं दुसऱ्या क्रमांकावर
टीआरपी रेटिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ये रिश्ता क्या कहलाता हैं मालिका आहे. राजन शाही यांची ही दुसरी मालिका टिआरपीमध्ये टॉप 5 मध्ये सामील आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेला 2.2 रेटिंग मिळालं आहे.
गुम हैं किसी के प्यार में
टीआरपी लिस्टमध्ये 'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेचा तिसरा क्रमांक आहे. भाविका शर्मा आणि हितेश भारद्वाज यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. 'गुम हैं किसी के प्यार में' शो पुन्हा टीआरपी लिस्टमध्ये टॉपला पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. या आठवड्यात 'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेला 2.2 रेटिंग मिळालं आहे.
उडने की आशा
'उडने की आशा' मालिका या आठवड्यात पुन्हा चौथ्या स्थानावर आहे. कंवर ढिल्लन आणि नेहा हरसोरा स्टारर हा शो प्रेक्षकांना पसंत पडला आहे. सचिन आणि सायलीच्या केमिस्ट्रीने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या आठवड्यात शोला 2.1 रेटिंग मिळालं आहे.
ॲडव्होकेट अंजली अवस्थी
ॲडव्होकेट अंजली अवस्थी टीआरपीमध्ये टॉप 5 यादीत पाचव्या स्थानावर कायम आहेत. गेल्या आठवड्यात रेटिंगमध्ये घसरल्यानंतर हा शो आता पुन्हा पहिल्या पाचमध्ये परतला आहे. या आठवड्यात शोला 2.1 रेटिंग मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :