Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 2 मार्चपासून सहभाग प्रक्रियेला सुरुवात
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं (Kon Honar Crorepati) नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे. यंदा स्पर्धकांना 1 मिस्डकॉल देऊन दोन कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
'मनोरंजनासह ज्ञानार्जन' हे वैशिष्ट्य असणाऱ्या या कार्यक्रमात अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं, याची प्रचिती मागच्या पर्वांमधून स्पर्धकांना आली आहे. या कार्यक्रमामध्ये आलेल्या स्पर्धकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाने नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
सचिन खेडेकर सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा!
'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या वर्षीही प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. सचिन खेडेकर उत्तम अभिनेते आहेतच, पण स्पर्धेतल्या स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं कामही ते करतात. त्यामुळे स्पर्धेतले सहभागी स्पर्धक अधिक आत्मविश्वासानी आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात.
View this post on Instagram
'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना 14 दिवसांत 14 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 2 मार्चपासून नोंदणी सुरू होत आहे. 2 मार्चपासून 15 मार्चपर्यंत रोज एक प्रश्न, असे 14 प्रश्न विचारले जाणार आहेत. '70390 77772' या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईल. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाने 1 मिस्डकॉल देऊन 2 कोटी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
'कोण होणार करोडपती'चं (Kon Honar Crorepati) नवं पर्व कधीपासून सुरू होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये या पर्वाची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. मागच्या पर्वात सेलिब्रिटीदेखील खेळ खेळले होते. त्यामुळे या पर्वातदेखील सेलिब्रिटी खेळतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो आऊट झाला आहे.
संबंधित बातम्या