Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची पहिली चावडी भरणार; सदस्यांचा खरा चेहरा समोर येणार!
Mahesh Manjrekar : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची पहिली चावडी आज भरणार आहे. महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वातील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हे पर्व चांगलचं गाजत आहे. आज या पर्वातील पहिली चावडी भरणार आहे. तसेच सदस्यांचे खरे चेहरेदेखील समोर येणार आहेत.
नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या आगामी भागाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणत आहेत," मित्रांनो बघितलं ना आठवडाभरात यांना कसे एकाहून एक जबरदस्त धक्के बसलेत. जोशमध्ये गेलेल्या सर्वांचे चेहरे पहिल्याच आठवड्यात समोर येऊ लागलेत. सगळ्याचा जाब विचारला जाणार आहे. भेटूयात बिग बॉस मराठीच्या चावडीवर".
View this post on Instagram
महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार?
बिग बॉस मराठीचे तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पहिल्याच आठवड्यात मांजरेकर कोणाची शाळा घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची पहिली कॅप्टन ठरली समृद्धी जाधव!
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ठरली आहे. समृद्धी कॅप्टन झाल्याने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.
संबंधित बातम्या