![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज; खास पाहुणा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Bigg Boss Marathi 4: लवकरच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात ‘पुष्पा’चा दमदार आवाज घुमणार आहे. अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात दमदार एन्ट्री घेणार आहे.
![Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज; खास पाहुणा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Bigg Boss Marathi 4 Actor Shreyas Talpade enters in BBM4 house for his aapdi thaapdi movie promotion Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज; खास पाहुणा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/da763f8fba41c55eef351b34a58f94fc1665063273363373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला (Bigg Boss Marathi Season 4) सुरुवात झाली आहे. रएकूण 16 स्पर्धक या घरात 100 दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ झाले आहेत. नेहमीप्रमाणेच यंदाच्या सीझनमध्येही धमाल, मस्ती अन् राडा पाहायला मिळणार आहे. अगदी घरात प्रवेश केल्यापासूनच काही स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळाली. अवघ्या चार दिवसांतच या शोमध्ये अनेक आवाज चढलेले पाहायला मिळाले. मात्र, या सगळ्या आवाजांवर भारी पडणारा एक आवाज या घरात प्रवेश करणार आहे.
लवकरच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात ‘पुष्पा’चा दमदार आवाज घुमणार आहे. अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात दमदार एन्ट्री घेणार आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. तर, श्रेयस एन्ट्री करतानाच खास पुष्पाच्या आवाजात ‘मै झुकेगा नही साला’ हा प्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहे.
पाहा प्रोमो :
भांडण, दंगा, आणि मनोरंजनाच्या धमाक्याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत होते. अखेर एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेहमी प्रमाणेच हे पर्व देखील धमाकेदार असणार आहे. यंदा देखील प्रेक्षकांना नवीन धमाके पाहायला मिळणार आहेत.
श्रेयस तळपदे देणार प्रेक्षकांना सरप्राईज
या ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात आता 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. तर, घरातील टास्क अर्थात खेळांना देखील सुरुवात झाली आहे. मात्र, अचानक घरात आलेल्या पाहुण्यामुळे घरातील इतर स्पर्धकांची झोप उडाली आहे. अर्थात काहींना वाटले की, ही एखादी वाईल्ड कार्ड एन्ट्री असू शकते. तर, एक नवीन स्पर्धक घरात आल्यामुळे आता स्पर्धेत आणखी चुरस रंगेल, असे देखील अनेकांना वाटते आहे. मात्र, घरात आलेला अभिनेता श्रेयस तळपदे हा सगळ्यांसाठीच एक खास सरप्राईज घेऊन आला आहे.
श्रेयस तळपदे त्याच्या ‘आपडी थापडी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात आला आहे. या दरम्यान तो स्पर्धकांशी संवाद तर साधणारच आहे. मात्र, धमाकेदार खेळ देखील आणखी रंगवणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : 'ऑल इज वेल' म्हणत 'बिग बॉस'चं दार उघडलं; स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?
Bigg Boss Marathi 4 : 'आटली बाटली फुटली'; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)