(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tharla Tar Mag : दुरावा निर्माण करण्यासाठी प्रियाचा नवा डाव, अर्जुन घेतोय बायकोवर संशय; नेमकं काय घडणार?
Tharla Tar Mag : ठरलं तर मग मालिकेत अर्जुन सायलीवर संशय घेत असल्याचं पाहायला मिळतं. पण जेव्हा सायलीला ही गोष्ट कळते तेव्हा ती देखील याची मज्जा घेते.
Tharla Tar Mag : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनचं प्रेम बहरताना दिसतंय. पण त्यांच्या प्रेमात प्रिया नेहमीप्रमाणे मिठाचा खडा टाकताना दिसतेय. अर्जुनचं सायलीवर खरं प्रेम आहे, हे प्रियाला कळतं. त्यामुळे ती अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा एकदा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. आता प्रिया अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी नवा डाव टाकते. पण तिच्या या नव्या खेळीमुळे अर्जुन आणि सायली आणखी जवळ येणार का याची उत्सुकता आहे.
प्रिया अर्जुन आणि सायलीमध्ये एका मुलामुळे गैरसमज निर्माण करुन देण्याचा प्रयत्न करते. सायली जेव्हा या मुलासोबत गप्पा मारत असते, त्यावेळी अर्जुन पाहतो. सायली बाहेर जाते हे सांगताच अर्जुन तिचा पाठलाग करतो. त्या मुलासोबत सायली जेव्हा हसून गप्पा मारत असते त्यावेळी अर्जुनचा जळफळाट होत असल्याचं पाहायला मिळतं. सायली आता त्या मुलाच्या बाईकवर बसून निघून जाणार का? असाही प्रश्न अर्जुनला पडतो. पण तेवढ्यात तो सायलीला गाठतो आणि तिला घरी चल असं म्हणतो.
महत्त्वाच्या कामासाठी सायली घराबाहेर पडते
सायली अर्जुन आणि तिच्या खास क्षणांसाठी प्लॅनिंग करत असते. त्यासाठी ती बाहेर पडून छानसा कॅफे शोधण्यासाठी बाहेर पडते. पण त्यावेळीच अर्जुन तिचा पाठलाग करतो. पण जेव्हा सायलीला तो एका मुलासोबत बोलताना पाहतो, त्यावेळी मात्र अर्जुनचा तिळपापड होतो. अर्जुन सायलीला गाठतो आणि तिला घरी चल म्हणतो. तसेच तुमचं महत्त्वाचं काम संपलं तर घरी जाऊया असं म्हणतो. त्यावेळी सायली त्याला म्हणते की, तुम्ही घरी जा मी येईन रिक्षाने. त्यावर अर्जुन म्हणतो रिक्षाने का? तेव्हा सायली विचार करते जर मी आता यांच्यसोबत गेले तर कॅफे कसा शोधणार?
अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन
मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला.