Anupam Kher : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, अनुपम खेर यांनी शेअर केले खास फोटो; म्हणाले...
Anupam Kher : अनुपम खेर यांनी विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे खास फोटो शेअर केले आहेत.
![Anupam Kher : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, अनुपम खेर यांनी शेअर केले खास फोटो; म्हणाले... Anupam Kher shared photos with Eknath Shinde and Devendra Fadanvis on Social media on Maharashtra victory marathi news Anupam Kher : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, अनुपम खेर यांनी शेअर केले खास फोटो; म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/16cc77620e7cf4889d4f8d6d52123cf31732512236482720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anupam Kher : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल (Maharashra Assembly Election Results 2024) लागताच अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. काहींच्या खोचक, काही प्रश्नार्थक, काही आक्षेपार्ह अशा सगळ्याच आशयाच्या प्रतिक्रिया जवळपास सर्वत स्तरातून उमटत होत्या. विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारला बहुमत मिळालं आहे. त्यावर कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्यात. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत फोटो शेअर केले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलाच्या लग्नात अनुपम खेर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत खास भेट झाली. या भेटीचे फोटो अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच यावर दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अनुपम खेर यांनी महाराष्ट्रातील विजयावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.
अनुपम खेर यांनी शेअर केले फोटो
अनुपम खेर यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यसोबत फोटो शेअर करत म्हटलं की, नव्याने विजयी झालेल्यांना भेटून खूप आनंद झाला. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा मुलगा अमेयच्या लग्नात एकनाथ शिंदे आणि अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यांच्या आनंदासाठी सर्वांचे अभिनंदन... जय हो! जय महाराष्ट्र
परेश रावल यांची संजय राऊतांवर मिश्किल टिप्पणी
विधानसभा निवडणुकांचे कल हाती येताच हा ईव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण, आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ, युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियानेच स्वत:ला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही? असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर संजय उवाच, संजय उगाचच! अशी एका वाक्यातच प्रतिक्रिया दिली होती.
It was so wonderful to meet the newly triumphant Hon. #EknathShinde ji and the dynamic #DevendraPhadnavis ji along with #AmrutaJi at the wedding reception of Mumbai’s esteemed police commissioner #VivekPhansalkar Ji’s son #Ameya’s to #Vishakha. Congratulations to everyone for… pic.twitter.com/Yue4QOpsjq
— Anupam Kher (@AnupamPKher) November 25, 2024
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)