Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'दया बेनची भूमिका साकारणार का?' ; चर्चांना पूर्णविराम देत राखीनं शेअर केली पोस्ट
अभिनेत्री राखी विजननं (Rakhi Vijan) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. दया ही आता पुन्हा या शोमध्ये परतणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan) ही दया ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. पण आता राखीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राखी विजाननं तिचा आणि दिशा वकानीचा फोटो असलेल्या एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये राखीनं लिहिलं, 'ही अफवा आहे. मी हे ऐकून थक्क झाले होते. मला मालिकेच्या प्रोड्यूसरकडून किंवा चॅनलकडून अजून कोणीही अप्रोच केलं नाही. ' 90 च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील‘स्वीटी माथूर’या भूमिकेमुळे राखी विजानला विशेष लोकप्रियता मिळाली.
राखी विजनची पोस्ट
View this post on Instagram
काय म्हणाले होते निर्माते?
मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दया या भूमिकेबाबत सांगितलं होतं. असित कुमार मोदी म्हणाले, 'सर्व गोष्टींसाठी थोडा वेळ लागेल. या व्यक्तिरेखेला शोमध्ये परत कसे आणायचे नियोजन सध्या आम्ही करत आहोत. याआधीही देखील आम्ही दयाबेनला शोमध्ये परत आणण्याचा विचार केला होता पण कोविड-19 मुळे ते शक्य झालं नाही. पण आता आम्ही लवकरच दयाबेनला शोमध्ये परत येणार आहे. आम्ही त्यांना एक-दोन महिन्यांत परत आणण्याचा प्रयत्न करू.'
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा :