एक्स्प्लोर
New Netflix Releases: 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत नेटफ्लिक्स युजर्सना पर्वणी; एकापेक्षा एक वरचढ फिल्म्स, शो होणार रिलीज
New Netflix Releases: सप्टेंबर महिना संपायला अजून 15 दिवस शिल्लक आहेत, येत्या दिवसांत नेटफ्लिक्सवर नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत, 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान अनेक नवनवे शो प्रदर्शित होतील.
New Netflix Releases from 15th September to 30th sep
1/9

New Netflix Releases: सप्टेंबर महिना संपायला अजून 15 दिवस शिल्लक आहेत, येत्या दिवसांत नेटफ्लिक्सवर नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत, 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान अनेक नवनवे शो प्रदर्शित होतील.
2/9

सप्टेंबर 2025 चे 15 दिवस उलटून गेले आहेत आणि आता महिन्यात आणखी 15 दिवस शिल्लक आहेत. एंटरटेनमेंट लवर्ससाठी, या 15 दिवसांत, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर अनेक उत्तम सीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होतील. आम्ही तुम्हाला त्यांची यादी आणि प्रदर्शनाची तारीख येथे सांगत आहोत.
3/9

शी सेड मे बी : रोमँटिक कॉमेडी फिल्म 'शी सेड मे बी' 19 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. बुकेट अलाकुस आणि एनजीओ द शॉच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या फिल्ममध्ये सरकन केयूलू आणि कादजा रेमन यांसारखे स्टार्स दिसलेत.
4/9

ऐलिस इन बॉर्डरलँड सीजन 3 : ही एक सायन्स-फिक्शन थ्रिलर सीरिज आहे. ताओ त्सुचिया आणि केंटो यामाजाकी स्टार ही वेब सीरिज 25 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
5/9

द बैड्स ऑफ बॉलिवूड: आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या सीरिजद्वारे आर्यन दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये लक्ष्य, सहर बंबा आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांचा कॅमिओसुद्धा असणार आहे.
6/9

1670: सीझन 2: वेब सीरिज '1670: सीझन 2' ही एक सटायरिकल कॉमेडी सीरिज आहे. या सीरिजचा पहिला सीझन डिसेंबर 2023 मध्ये रिलीज करण्यात आलेला. आता या सीरिजचा दुसरा सीझन 17 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
7/9

'नाइटमेयर ऑफ नेचर: केबिन इन द वुड्स' ही एक डॉक्यूमेंट्री सीरीज आहे. यूएसची ही डॉक्युमेंट्री 30 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केली जाणार आहे.
8/9

फ्रेंच लव्हर :'फ्रेंच लवर' ही एक रोमँटिक फिल्म आहे, जी लिजा नीना रीव्सनं डायरेक्ट केली आहे. ही फिल्म 26 सप्टेंबर रोजी रिलीज केली जाईल. 'फ्रेंच लव्हर' मध्ये उमर से, सारा गिरोदो आणि पास्कल आर्बिलेट यांसारखे स्टार्स लीड रोलमध्ये आहेत.
9/9

हाऊस ऑफ गिनीज: ही एक हिस्टोरिकल ड्रामा सीरीज आहे. ही सीरिज 25 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. स्टीवन नाईटच्या या सीरिजमध्ये 8 एपिसोड आहेत. या सीरिजमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
Published at : 15 Sep 2025 08:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण























