Income Tax Department : आतापर्यंत किती करदात्यांनी आयटीआर भरला, आयकर विभागाकडून आकडेवारी जाहीर, वेबसाईटच्या अडचणींबाबत दिली अपडेट
ITR Filing : आयकर विभागानं सोशल मीडियावर पोस्ट करुन किती करदात्यांनी आयटीआर फाईल केला याबाबत माहिती दिली आहे. पोर्टलला येणाऱ्या अडचणींबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत संपण्यास आता काही मिनिटं शिल्लक आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत आयटीआर फाईल करण्यासाठी थांबलेल्या करदात्यांना वेबसाईटवर फायलिंग करताना अडचणी येत असल्याचं समोर आलं आहेत. याबाबत आयकर विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे.15 सप्टेंबरला सायंकाळी 5.17 वाजता आयकर विभागानं पोस्ट करत किती करदात्यांनी आयटीआर फाईल केला याबाबत माहिती दिली आहे.
इन्कम टॅक्स विभागाकडून 7 कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केल्याची माहिती दिली. करदाते अजूनही आयटीआर फाईल करत असल्याची माहिती देण्यात आली. करदाते आणि टॅक्स प्रोफेशनल्सचे आम्ही या टप्प्यांपर्यंत पोहोचलो याबद्दल आभार मानतो. ज्यांनी असेसमेंट वर्ष 2025-26 साठी आयटीआर फाईल केले नाहीत त्यांचे आभार मानतो असं आयकर विभागानं म्हटलं आहे.
करदात्यांना आयटीआर फायलिंगसाठी मदत करण्यासाठी, कराची रक्कम भरण्यासाठी आणि इतर सेवांसाठी आमचा मदतकक्ष 24x7 तास कार्यरत आहे. आम्ही फोन, लाईव्ह चॅट, वेबेक्स सेशन आणि एक्सच्या माध्यमातून मदत करत असल्याचं आयकर विभागानं म्हटलं.
आयकर विभागाच्या एक्स हँडलवर वेबसाईट संदर्भातील समस्या किंवा आयटीआर भरताना येणाऱ्या समस्या मांडणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाकडून रिप्लाय देण्यात येत आहेत. ज्यामध्ये पॅन कार्ड क्रमांक आणि मोबईल क्रमांक orm@cpc.incometax.gov.in या ईमेलवर मेल करण्यास सांगण्यात आलं आहे. आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल, असा रिप्लाय देण्यात आला आहे.
वेबसाईटच्या तांत्रिक समस्यांबाबत आयकर विभागानं काय सांगितलं?
इन्कम टॅक्स पोर्टलवर ज्यांना अडचणी येत आहेत त्या अडचणी लोकल सिस्टीम्स किंवा ब्राऊजर सेटिंगमुळं येत असाव्यात, असं आयकर विभागानं म्हटलं.
आयकर विभागनं यूजर्सना टेम्पररी फाईल डिलिट करण्यास सांगितलं आहे. याशिवा ब्राऊजरच्या कॅचे आणि कुकीज क्लिअर करण्याचा सल्ला दिला आहे. क्रोम किंवा एजचं अपडेटेड वर्जन वापरावं. इनकॉगनिटो किंवा प्रायवेट मोडमध्ये ब्राऊजर वापरा. ब्राऊजर एक्सटेन्शन डिसेबल करा. ब्राऊजर अपडेट करा. वेगळ्या नेटवर्कचा वापर करा, असं आवाहन आयकर विभागानं केलं आहे.
More than 7 crore ITRs have been filed so far and still counting (15th September) !
— Income Tax India (@IncomeTaxIndia) September 15, 2025
We extend our gratitude to taxpayers and tax professionals for helping us reach this milestone, and urge all those who haven't filed ITR for AY 2025-26, to file their ITR.
To assist taxpayers… pic.twitter.com/4bnJcuwDEB

























