Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता' मधील नव्या दयाबाबत निर्माते म्हणाले, 'प्रेक्षकांनी समजून घ्यावं...'
असित कुमार मोदी (Asit Modi) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दया या भूमिकेबाबत सांगितलं.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीच्या (Disha Vakani) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. दया ही आता पुन्हा या शोमध्ये परतणार आहे, असं म्हटलं जात आहे. अभिनेत्री राखी विजन ही दया ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Modi) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दया या भूमिकेबाबत सांगितलं.
असित कुमार मोदी म्हणाले, 'सर्व गोष्टींसाठी थोडा वेळ लागेल. या व्यक्तिरेखेला शोमध्ये परत कसे आणायचे नियोजन सध्या आम्ही करत आहोत. याआधीही देखील आम्ही दयाबेनला शोमध्ये परत आणण्याचा विचार केला होता पण कोविड-19 मुळे ते शक्य झालं नाही. पण आता आम्ही लवकरच दयाबेनला शोमध्ये परत येणार आहे. आम्ही त्यांना एक-दोन महिन्यांत परत आणण्याचा प्रयत्न करू. दिशा वाकाणीने शोमध्ये परतावे अशी आमची इच्छा आहे, परंतु तिच्या काही कौटुंबिक बांधिलकी आहेत. तरीही मला आशा आहे की ती परत येईल. जर नवा चेहरा शोमध्ये आला तर नवी ऊर्जा मिळेल. शो सुरु राहिला पाहिजे हे प्रेक्षकांनी समजून घ्यावं. आता 14 वर्ष झाली आहेत. काही रिप्लेसमेंट होऊ शकतात. मला यासाठी तयार राहावं लागेल.'
शैलेश लोढा यांच्याबाबत असित म्हणाले, 'शैलेश लोढा हे पुन्हा शोमध्ये येऊ शकतात. माझ्या शोमधील अभिनेता हा मालिकासोडून गेला आहे, ही गोष्ट मला चांगली वाटत नाही. ' राखी विजान ही लवकरच दया या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा आहे.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा: