एक्स्प्लोर

TMKOC : 'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेनेतील कलाकारांनी शो सोडला. आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षानंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मागील काही वर्षांपासून चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना  या व्यक्तीरेखेच्या नावाने ओळखले जाते. मात्र, त्याच वेळी ही मालिका कलाकार आणि निर्मात्यांमधील वादामुळेही चर्चेत राहिली आहे. काही कलाकारांनी वादातून मालिका सोडली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेनेतील कलाकारांनी शो सोडला. आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षानंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बालकलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या टप्पू सेनेतील टप्पू अर्थात भव्या गांधी, सोनू अर्थान झील मेहता यांनी या आधीच मालिका सोडली. आता आणखी एका कलाकाराने मालिकेला राम राम केला आहे. 'तारक मेहता का...' मध्ये गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह (Kush Shah) याने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू होती. आता कुशच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. 

कुश शाहने मालिका सोडली?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार गोली अर्थात कुश शाह हा न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमधील एका बीचवर वेळ घालवताना कुश शाह दिसला आहे. रेडिटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, एका चाहत्याने म्हटले की,   “स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या इथे जाताना न्यूयॉर्कमध्ये अचानक कुश भेटला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचे त्याने मला सांगितले”.

One More Tmkoc actor has left the show ....you will be missed golya
byu/Safe-Concern-4803 inTMKOC

गोलीच्या चाहत्याची ही पोस्ट व्हायरल होत असून मालिकेच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले की,  मी गोली आणि जेठालाल यांची मस्ती एन्जॉय करत होतो, पण त्याच्यासाठी हे सगळं चांगले आहे. एकाने 'तारक मेहता...' मध्ये आता पूर्वीसारखी मजा येणार नसल्याचे सांगितले.  

कुश शाहने काय म्हटले?

दरम्यान, कुशने मालिका सोडल्याबाबत मालिकेच्या टीमकडून कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.  तर, 'न्यूज 18' सोबत बोलताना कुशने मालिका सोडली नसल्याचे म्हटले आणि अधिक भाष्य करण्यास नकार दिला.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 28 September 2024Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहितीRajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Embed widget