Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'मी चांगली पत्नी, आई...'; ट्रोल करणाऱ्यांना तारक मेहता फेम अभिनेत्रीनं दिलं उत्तर
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील अभिनेत्री प्रिया आहुजानं (Priya Ahuja) तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील कलाकारांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक हे कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतात. या फोटोंचे नेटकरी कौतुक करतात तर काही युझर्स या फोटोंना ट्रोल करतात. नुकताच एका अभिनेत्रीला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील रिटा रिपोर्ट ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजानं (Priya Ahuja) तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
प्रियानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कमेंट केली. तुम्ही स्वत:वर इतका विश्वास ठेवा की, कोणाच्याही मतांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. या फोटोला कमेंट करुन काहींनी तिला ट्रोल केलं.
View this post on Instagram
प्रियानं ट्रोलर्सला दिलं उत्तर
प्रियानं इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं. तिनं पोस्टमध्ये लिहिलं,'मी शेअर केलेल्या फोटोला ट्रोल करणार्यांना मला हे सांगायचं आहे की, तुम्ही जे बोलता त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट करुन मालवला (प्रियाचा पती) हा प्रश्न विचारला की, तो मला असे कपडे घालण्याची परवानगी कशी देऊ शकतो? काही लोक माझ्या मुलाबाबत म्हणाजेच अरदासबाबत देखील बोलत होते की, त्याची आई म्हणजेच मी त्याला अशी शिकवण देत आहे. मी चांगली पत्नी किंवा आई आहे की नाही हे मालव आणि अरदास यांना ठरवू द्या. मला कोणतेही कपडे घालण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.काय परिधान करावे, हे मी ठरवतो.'
2020 मध्ये प्रियानं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























