Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील या अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 28 जुलै 2008 रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माला (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 28 जुलै 2008 रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहूजा (priya ahuja) या अभिनेत्रीने लग्नाच्या 10 वाढदिवसाला पती मालव राजदासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
19 फेब्रुवारीला प्रिया आणि मालव यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियाने तिच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. प्रियाचे पती दिग्दर्शक आहेत. प्रिया आणि मालव यांना अरदास नावाचा मुलगा आहे. लग्नाबरोबरच मेहंदी, हळद आणि संगित या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सुनैना फौजदार, कुश शाह आणि पलक सिधवानी या कलाकारांनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
प्रियाला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली.
Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर