एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : बेपत्ता होण्याआधी 'तारक मेहता का..' च्या सोढीने शेवटचा मेसेज कोणाला केला? समोर आली मोठी अपडेट...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing :   छोट्या  पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते  गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  निर्माते जेडी मजीठिया यांनी सांगितले की, आपल्याला भक्ती सोनी यांनी फोन करून गुरुचरण चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. त्याशिवाय गुरुचरण सिंह यांनी शेवटचा मेसेज कोणाला केला, याबद्दलही मजीठिया यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

गुरुचरण सिंह यांनी शेवटचा मेसेज कोणाला केलेला?

गुरुचरण सिंह हे 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी घरातून निघाले होते. दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईकरीता विमान होते. मात्र, गुरुचरण सिंह हे मुंबईला पोहचलेच नाही. इतकंच नाही तर ते दिल्लीतील आपल्या घरीदेखील परतले नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह  हे विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, चक्रावून सोडणारी गोष्ट म्हणजे विमानात बसण्याआधी गुरुचरण सिंह यांनी आपण विमानात बसत असल्याचे सांगितले.  मग, आता गुरुचरण सिंह नेमके गेले कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल... 

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आता अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी हरवले असल्याची तक्रार दाखल केली होती. गुरुचरण सिंह यांचे वृद्ध आई-वडील सातत्याने त्यांचा शोध घेत होते. मात्र, अखेर त्यांनी आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार पोलिसांत दिली. 

गुरुचरण बाबत माहिती मिळाल्यानंतर काय केले?

निर्माते जेडी मजीठिया यांनी सांगितले की, गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने ही माहिती आपल्या मित्रपरिवारांना दिली. जेणेकरून त्यांच्याबद्दल काही मिळेल. त्याशिवाय, 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेचे निर्माते आणि जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनादेखील ही माहिती कळवण्यात आली. गुरुचरण सिंह यांची मानसिक स्थिती चांगली असल्याचेही मजीठिया यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

इतर संंबंधित बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget