Suraj Chavan : बाळांनो खूप शिका, मला शिक्षण मिळालं नाही..., बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण बारातमीत, शाळेलाही दिली भेट
Suraj Chavan : सूरज चव्हाण त्याची बिग बॉसची ट्रॉफी घेऊन त्याच्या गावात पोहचला. तसेच त्याने त्याच्या शाळेलाही भेट दिली आहे.
Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) ट्रॉफीवर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) नाव कोरलं आहे. सूरजच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. इतकच नव्हे तर अगदी राजकीय क्षेत्रातूनही त्याचं भरभरुन कौतुक करण्यात आलं आहे. दरम्यान ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजने जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शनही घेतलं.
सूरज ट्रॉफी घेऊन त्याच्या गावालाही पोहचला होता. त्याने त्याच्या शाळेलाही भेट दिली. यावेळी त्याने शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. सूरजने त्याच्या या ट्रॉफीचं त्याच्या आईवडिलांना दिलं आहे. त्याचप्रमाणे सध्या सगळीकडे सूरज चव्हाण या एकाच नावाची हवा आहे.
सूरजने शाळेतल्या मुलांशी साधला संवाद
सूरज ट्रॉफी घेऊन त्याच्या शाळेतही गेला होता. यावेळी शाळेतल्या मुलांसोबत बोलताना सूरजने म्हटलं की, “बाळांनो खूप शिका, मला शिक्षण मिळालं नाही कारण, मी गरीब होतो. कालांतराने संधी मिळाली त्यानंतर मलाच शिक्षणाची आवड राहिली नाही. इच्छाच नव्हती…मग, मी पळून डोंगरावर जायचो. तुम्ही असं करू नका.”
अजितदादांनी दिला भेटीचा प्रस्ताव, सूरज म्हणाला...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आताच मी सुरज चव्हाणशी फोनवरून बोललो. त्याला मी सांगितलं की, मी आज बारामतीत आहे, आपण भेटूया तो म्हणाला, मी प्रयत्न करतो..."
सूरजनं ट्रॉफी जिंकल्यावर अजितदादांनी केलेली खास पोस्ट
अजित पवार यांनी आधीचं ट्विटर म्हणजेच, एक्स मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लिहिलेलं की, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!"
View this post on Instagram
View this post on Instagram