एक्स्प्लोर

Marathi Movie : Marathi Movie : 'श्वास'नंतर संदीप सावंत यांची नवी कलाकृती, ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie : ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi Movie : हल्लीची तरुण पिढी ही टॅलेंटेड आहे, असं कायम म्हलं जातं. याच  जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहतायेत.  'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण. त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता (Marathi Actor) जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे 'श्वास' सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सावंत (Sandip Sawant) यांची ही नवी कलाकृती आहे..

 पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती  भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण  भूमिका आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘20 व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे.  8 नोव्हेंबरला  हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

सिनेमाचा टीझर रिलीज

या  सिनेमाचा  टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या  टीझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची  झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. इचलकरंजी तसेच  तिथल्या  डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी संस्थेत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर ,सांगली आणि गणेशवाडीचे  विशेष  सहकार्य या चित्रपटासाठी  लाभले आहे.  

'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित सिनेमा

नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी  खूप म्हत्त्वाचा असल्याचं  जयदीप  सांगतो.  डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट  सर्वांना लढण्याचं बळ निश्चितचं  देईल. पायोस  मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर  निर्मित  ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे.साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचेआहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाशजाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. 

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगतपाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी  सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Panorama Studios (@panorama_studios)

ही बातमी वाचा : 

Manjiri Oak : '...घरातला स्टीलचा डब्बाही कुणीतरी दिलेलाच असणार...', 'धर्मवीर' सिनेमानंतर झालेल्या ट्रोलिंगवर मंजिरी ओकचं स्पष्ट भाष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget