एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : 35 वर्षांनंतर शाहरुख खानच्या शोचा सीक्वेल, अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन करणार पदार्पण

Fauji TV Serial Sequel : शाहरुख खानचा टीव्ही शो 35 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार असून यामध्ये विकी जैन अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Vicky Jain Acting Debut : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानची छोट्या पडद्यावरील मालिका फौजी 35 वर्षांनंतर परतणार आहे. फौजी मालिका छोट्या पडद्यावर परतणार आहे. यामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या नवऱ्याचंही नशीब फळफळलं आहे. विकी जैन लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सध्या लाफ्टर शेफमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विकी जैन लवकरच ॲक्टिंग करताना दिसणार आहे. विकी जैन फौजी टीव्ही मालिकेच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. फौजी हा शाहरुख खानचा पहिला ॲक्टिंग प्रोजेक्ट होता. 1989 मध्ये आलेल्या या टीव्ही शोचा 35 वर्षांनंतर दुसरा भाग येणार आहे.

अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन टीव्ही विश्वात पदार्पण करणार

फौजीच्या सीक्वेलमधून अंकिता लोखंडेचा पती विकी जैन टीव्ही विश्वात पदार्पण करणार आहे. विकी जैन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉस 17 मध्ये दिसला होता, त्यानंतर तो कॉमेडी शो लाफ्टर शोमध्ये दिसला. आता ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, विकी जैन फौजी शोच्या सीक्वेलमधून ॲक्टींग डेब्यू करणार आहे. विकी जैन कर्नल संजय सिंह या भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला छोट्या पडद्यावर अभिनय करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

संदीप सिंह आणि विकी जैन शोचे निर्माते

संदीप सिंह आणि विकी जैन मिळून 'फौजी 2'ची निर्मिती करणार आहेत, तर अभिनव पारीक शोचे दिग्दर्शक आहेत. 'फौजी 2' ची घोषणा करताना संदीप सिंहने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर केलं आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "भारतात बनवलेला सर्वात प्रतिष्ठित शो परत येत आहे! आमच्या खऱ्या नायक-फौजी 2 या महान शोचे पुनरागमन आमच्यासाठी गौरवशाली आहे".

फौजी 2 शोची घोषणा

View this post on Instagram
 
A post shared by SANDEEP SINGH (@officialsandipssingh)

'फौजी 2' मध्ये विकीसह गौहर खानही दिसणार

'फौजी' शोच्या सिक्वेलमध्येही विकी कौशलसोबत गौहर खानही दिसणार आहे. फौजी 2 मध्ये गौहर लेफ्टनंट सिमरजीत कौरच्या भूमिकेत झळकणार आहे. यासोबत फौजीच्या सीक्वेलमध्ये काही नवे चेहरेही दिसणार आहेत. आशिष भारद्वाज, उत्कर्ष कोहली, रुद्र सोनी, अमरदीप फोगट, अयान मनचंदा, नील सतपुरा, सुष्मिता भंडारी, मानसी, सुवंश धर, अमन सिंग दीप, उदित कपूर आणि प्रियांशू राजगुरू या कलाकारांना या शोमधून संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पुरुषांना ड्रग्स देऊन लुटायची 'ही' गायिका, पैशासाठी बनली स्ट्रीपर; स्वत: केलं मान्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget