पुरुषांना ड्रग्स देऊन लुटायची 'ही' गायिका, पैशासाठी बनली स्ट्रीपर; स्वत: केलं मान्य
Rapper Cardi B Controversy : अमेरिकन गायिका कार्डी बी आधी स्ट्रीपर होती आणि पैशासाठी तरुणांना ड्रग्स देऊन लुटायची, असं तिने एका मुलाखतीत मान्य केलं होतं.
Singer Cardi B Controversy : प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आणि रॅपर कार्डी बी (Cardi B) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कार्डी बीने गेल्या महिन्यात तिसऱ्या मुलाला जन्म दिला. पती रॅपर ऑफसेटपासून विभक्त झाल्यानंतर एक महिन्याने तिला प्रेग्नंसीबाबत समजलं. त्यानंतर 7 सप्टेंबरला तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कार्डी बी कायम विवादात असते. कार्डी बी आधी स्ट्रीपर होती आणि पैशासाठी तरुणांना ड्रग्स देऊन लुटायची, असं तिने एका मुलाखतीत मान्य केलं होतं, ज्यामुळे तिच्यावर खूप टीकाही झाली होती.
तरुणांना ड्रग्स देऊन लुटायची 'ही' गायिका
अमेरिकन गायिका आणि रॅपर कार्डी बी (Cardi B) हिचं खरं नाव बेल्किस मार्लेनिस अल्मानजार आहे. कार्डी बी तिच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणे पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत राहिली आहे. कार्डी बीची अनेक गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. कार्डी बीचा एक जुन्हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या जुन्या आयुष्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती.
पैशासाठी स्ट्रीपर बनल्याचं केलं मान्य
कार्डी बी तिच्या भूतकाळातील आयुष्य आणि लाइफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. कार्डी बी (Cardi B) हिचा एक तीन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ चर्चेत आला होता, ज्यामध्ये तिने भूतकाळात स्ट्रीपर असल्याचं मान्य केलं होतं. कार्डी बीने तीन वर्षांपूर्वी इंस्टाग्राम लाईव्हवर मान्य केलं होतं की, स्ट्रीपरचं काम करत असताना ती पुरुषांना ड्रग्स द्यायची आणि त्यांना लुटायची. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामुळे खळबळ माजली होती.
व्हिडीओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
कार्डी बीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला समोर येत याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सिंगर-रॅपर कार्डी बी आधी स्ट्रीपरचं काम करायची. यादरम्यान, जे पुरुष तिच्यासोबत लैंगिक संबंध बनवण्यासाठी यायचे त्यांना ती ड्रग्स द्यायची आणि लुटायची. या व्हिडीओमुळे कार्डी बीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
"त्यावेळी जगण्यासाठी आवश्यक वाटलं ते केलं"
ट्रोलर्सला उत्तर देताना कार्डी बीने सांगितलं होतं की, या सर्व तिच्या भूतकाळातील गोष्टी आहेत. तिच्या जगण्यासाठी तिला जे आवश्यक वाटलं ते तिने केलं. तिने भूतकाळात चुकीचं काम केल्याची खंत तिच्याही मनात आहे. तिने यावेळी म्हटलं की, मी कधीच म्हटलं नाही की, "मी परफेक्ट आहे, असं मी कधीच म्हटलं नाही. त्यावेळीचा तो निर्णय चुकीचा असो किंवा नसो, मी जगण्यासाठी जे काही करायचे ते केले. मी परिपूर्ण असल्याचा किंवा आदर्श जगातून आले, असा दावा मी कधीही केला नाही".
महत्त्वाच्या इतर बातम्या :