'दिल तो बच्चा है जी' म्हणत सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदेने परिधान केला शाळेचा गणवेश
सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदेने 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' कार्यक्रमासाठी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. तसेच बालपणीच्या आठवणींना उजळा दिला आहे.
Mi honar superstar chote ustad : बालपण म्हटलं की आठवणींचा पूर येत असतो. जगातील प्रत्येकाचे बालपण हे खास असते. बालपणीच्या आठवणीत बडबड गीतांचा समावेश करायलाच हवा. मोठेपणी बडबड गीत म्हटलं की 'लहानपन देगा देवा' हे वेळोवेळी आठवत असतं. आता 'लहानपण देगा देवा' हे सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदेने फक्त मनातच आनलं नाही तर प्रत्यक्षात अमलातदेखील आणलं आहे. नुकतेच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद'च्या प्रोमोसाठी या दिग्गजांनी शाळेचा गणवेश परिधान करत बालपणीच्या आठवणींना उजळा दिला आहे.
उद्या बालदिन असल्यामुळे कित्येकांना लहाणपणीच्या आठवणी आठवत आहेत. लहाणपण म्हटलं की शाळा, मधली सुट्टी, खाऊ, मजा, मस्ती, धमाल, बडबड गीत, शाळेचा गणवेश असं सगळं डोळ्यासमोर येतं. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे देखील आता शाळेच्या आठवणींमध्ये हरवले आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उंच भरारी घ्यायची असेल तर 'मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद'चा मंच तुम्हाला खुणावतोय, अशी हटके थीम या प्रोमोसाठी वापरण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदेने शाळेचा गणवेश परिधान केला आहे.
या भन्नाट प्रोमोशूट विषयी सांगताना वैशाली सामंत म्हणाल्या,"हा प्रोमोशूट करताना प्रचंड दडपण होतं. दोन वेण्या आणि शाळेच्या गणवेशामध्ये मला प्रेक्षक स्वीकारतील का याची भीती होती. पण प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत आहे". दरम्यान सचिन पिळगावकरांनी बालदिनाची खास आठवण सांगितली. सचिन पिळगावकर म्हणाले, १४ नोव्हेंबर अर्थातच चाचा नेहरुंची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. या दिवसाची माझी खास आठवण म्हणजे मला प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरुंची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेता आला. हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील".
आदर्श शिंदे प्रोमोविषयी म्हणाला,"या प्रोमोसाठी मी जेव्हा गणवेश घातला तेव्हा मी शाळेच्या दिवसांमध्येच हरवून गेलो होतो. ते सगळे दिवस मला आठवले. प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची मला खात्री आहे". 'मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद' हा कार्यक्रम प्रेक्षकांना 4 डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या
Katrina Kaif आणि Vicky Kaushal यांच्या लग्नसोहळ्याचं 'वऱ्हाड' निघालं राजस्थानला...'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी
अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा 'खिलाडी'; या चित्रपटांनी केली 100 कोटींपेक्षा जास्त कमाई
Govinda Naam Mera: 'गोविंदा नाम मेरा': विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची चर्चा; भूमी आणि कियाराचा हटके लूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA