Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उलगडणार सई ताम्हणकरच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास; रंगणार विशेष भाग
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल सहभागी होणार आहेत.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सौम्या डाबरीवाल (Saumya Dabriwal) सहभागी होणार आहेत.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात 'प्रोजेक्ट बाला' या संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील 'विमलाश्रम घरकुल' या संस्थेसाठी खेळणार आहेत.
View this post on Instagram
सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ
समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल' या संस्थेसाठी खेळणार आहेत.
1992 साली 'विमलाश्रम घरकुला'ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर 'प्रोजेक्ट बाला' या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.
कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप
संबंधित बातम्या