(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : 'तुम्ही निक्कीचं पायपुसणं, हाच तुमचा गेम'; रितेश भाऊकडून अरबाजच्या खेळाचे वाभाडे
Bigg Boss Marathi Season 5 : भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अरबाच्या खेळावर भाष्य केलं असून त्याच्या खेळं नेमका कसा सुरु आहे,हे सांगितलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव या ग्रुपचा चांगलाच क्लास लावण्यात आला. अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीची जी घरात चर्चा होत होती या आठवड्यात ती चर्चा वेगळ्याच विषयावरुन झाली. निक्की आणि अभिजीतची मैत्री ही सर्वात जास्त अरबाजला खटकली. त्यावरुन त्याचं आणि निक्कीचं चांगलच वाजलं.
अरबाजच्या या आठवड्यातील घरातील वागण्यामुळे रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर त्याची चांगलीच शाळा घेतली. दरम्यान अरबाजच्या खेळाचं वर्णन करताना रितेशने त्याचं पायपुसणं असं वर्णन केलं. तसेच अरबाज निक्कीशी बोलतो किंवा निक्कीविषयी बोलतो हाच त्याचा खेळ असल्याचंही रितेशने म्हटलं आहे.
'तुम्ही निक्कीचं पायपुसणं आहात'
रितेशने म्हटलं की, अरबाज तुम्हाला वाटतं का तुम्ही बॉस आहात? त्यावर अरबाजने म्हटलं की, नाही. पुढे रितेशने म्हटलं की, तुम्ही निक्कीच्या बाजूला बसता, तुम्ही निक्कीच्या अवतीभवती आहात. याला सिनेमाच्या भाषेमध्ये सपोर्टिंग कास्ट म्हणतात. एकतर निक्कीसोबत चांगलं बोलायचं नाहीतर निक्कीच्या मागे तिच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं एवढाच तुमचा गेम आहे. निक्की तुम्हाला कसं वापरते तुम्हाला माहितेय का? तुम्ही निक्कीचं पायपुसणं आहात. चालायचं, पुसायचं आणि निघायचं. दुर्दैवाने तुमच्या चेहऱ्यावर पायपुसण्यावर जसं लिहिलं असतं स्वागतम् तसं लिहिलं असतं.
'मी रितेश देशमुख आहे...'
दरम्यान अरबाजच्या खेळावर सुरुवातीला टीप्पणी करत रितेश देशमुखने म्हटलं की, मी रितेश देशमुख आहे. तुम्ही मला हलक्यात घेऊ नका. मागच्या आठवड्यात जेव्हा मी तुम्हाला बोलत होतो, तेव्हा तुम्ही बरंच काही बोलत होतात, असं म्हणत अरबाजला त्याचा गेम सुधारण्याचा सल्ला रितेशने त्याला दिला आहे.
जान्हवीला झाली शिक्षा
जान्हवीच्या या आठवड्यातील वागण्यामुळे रितेशने तिला आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली आहे. त्याचप्रमाणे भाऊच्या धक्क्यावरुन या आठवड्यासाठी तिची हकालपट्टी केली. त्यामुळे घरातल्या सदस्यांना त्यांच्या वागण्यावरुन रितेश भाऊकडून चांगलीच चपराक बसत असल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram