एक्स्प्लोर
राजेश शृंगारपुरे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात!
सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला होता.

मुंबई : मराठी बिग बॉसच्या घरात आणखी एका पाहुण्याची एण्ट्री होणार आहे. पण हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून, अभिनेता राजेश शृंगारपुरे आहे. वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे राजेश शृंगारपुरेचं बिग बॉसच्या घरात पुनरागमन होणार आहे. आज किंवा उद्याच राजेश पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसेल.
रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे मराठी बिग बॉसची प्रचंड चर्चा होती. शिवाय अश्लीलता पसरवल्याप्रकरणी राजेश आणि बिग बॉसवर गुन्हाही दाखल झाला होता. सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला 20 मे रोजी बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला होता. परंतु आता चार आठवड्यानंतर राजेश पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. राजेश स्पर्धेत पुन्हा सहभागी झाला आहे की काही दिवसांसाठी घरात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. कोणाकोणाची वाईल्ड कार्ड एण्ट्री याआधी हर्षदा खानविलकर, शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले, त्यागराज खाडिलकर यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. त्यापैकी हर्षदा पाहुणी म्हणून केवळ आठवड्याभरासाठी सहभागी झाली होती. तर शर्मिष्ठा, नंदकिशोर आणि त्यागराज स्पर्धक म्हणून सहभागी झाले. मात्र घरातून बाहेर झालेल्या एखाद्या स्पर्धकाची वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाहेर पडल्यानंतर राजेशची प्रतिक्रिया ‘मराठी बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या राजेश शृंगारपुरेने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी बायकोला मिठी मारली. तिलाही आनंद झाला, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं. मी जे वागलो ते खरं होतं. रेशमसोबतचे माझं नातं आयुष्यभरासाठी असेल. एक मैत्रिण म्हणून ती कायमची माझ्या घरची सदस्य असेल. बिग बॉस मराठीमध्ये एक जिवाभावाची मैत्रिण मला भेटली, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं. दरम्यान, वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली तर परत मी बिग बॉसमध्ये जाईन. पण त्यावेळी नव्या स्ट्रॅटेजीने, तयारी करुन जाईन, अशी प्रतिक्रिया राजेशने दिली होती. आता त्याची वाईल्ड कार्डने एण्ट्री झाल्याने बिग बॉसच्य घरात काय नव्या घडमोडी घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. संबंधित बातम्या बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर ‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार? बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे मराठी बिग बॉसची प्रचंड चर्चा होती. शिवाय अश्लीलता पसरवल्याप्रकरणी राजेश आणि बिग बॉसवर गुन्हाही दाखल झाला होता. सगळ्या नाट्यमय घडामोडींमुळे राजेश शृंगारपुरेला 20 मे रोजी बीग बॉसच्या घरातून डच्चू मिळाला होता. परंतु आता चार आठवड्यानंतर राजेश पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. राजेश स्पर्धेत पुन्हा सहभागी झाला आहे की काही दिवसांसाठी घरात येणार आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. कोणाकोणाची वाईल्ड कार्ड एण्ट्री याआधी हर्षदा खानविलकर, शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले, त्यागराज खाडिलकर यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली होती. त्यापैकी हर्षदा पाहुणी म्हणून केवळ आठवड्याभरासाठी सहभागी झाली होती. तर शर्मिष्ठा, नंदकिशोर आणि त्यागराज स्पर्धक म्हणून सहभागी झाले. मात्र घरातून बाहेर झालेल्या एखाद्या स्पर्धकाची वाईल्ड कार्डद्वारे एण्ट्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाहेर पडल्यानंतर राजेशची प्रतिक्रिया ‘मराठी बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या राजेश शृंगारपुरेने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी बायकोला मिठी मारली. तिलाही आनंद झाला, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं. मी जे वागलो ते खरं होतं. रेशमसोबतचे माझं नातं आयुष्यभरासाठी असेल. एक मैत्रिण म्हणून ती कायमची माझ्या घरची सदस्य असेल. बिग बॉस मराठीमध्ये एक जिवाभावाची मैत्रिण मला भेटली, असं राजेश शृंगारपुरेने सांगितलं. दरम्यान, वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळाली तर परत मी बिग बॉसमध्ये जाईन. पण त्यावेळी नव्या स्ट्रॅटेजीने, तयारी करुन जाईन, अशी प्रतिक्रिया राजेशने दिली होती. आता त्याची वाईल्ड कार्डने एण्ट्री झाल्याने बिग बॉसच्य घरात काय नव्या घडमोडी घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. संबंधित बातम्या बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर ‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार? बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























