Premas Rang Yave: प्रेमाला कुठला रंग, कुठलं रूप नाही; 'प्रेमास रंग यावे' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत, हे 'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave) या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

Premas Rang Yave: आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, की त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? 20 फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली 'प्रेमास रंग यावे' (Premas Rang Yave) ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.
सन मराठीवरील ही नवीन मालिका सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे पटवून देते. कारण म्हणतात ना, प्रेमासारखं दुसरं कुठलं सुख नाही. प्रेमाला कुठला रंग, कुठलं रूप नाही. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले होते.
View this post on Instagram
या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या 'अक्षरा' या मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी असून निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका अभिनेता रोहित शिवलकर साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी अमिताचा या मालिकेमधील लूक रिव्हिल करण्यात आला होता. या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल, किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे. या प्रेक्षकाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
