Premachi Goshta Serial Update : सागर-आदित्यमधील बंध आणखी घट्ट होणार, सावनीला आपल्या चुकीची जाणीव होणार?
Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धनच्या तोंडातून खरा हेतू बाहेर पडल्याने सावनीला धक्का बसतो. तर, दुसरीकडे आरती मुक्ताला कार्तिकचे खरे रुप सांगणार आहे. प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये काहीशी भावूक, संवेदनशील गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सागर आणि आदित्यमधील वडील-मुलाचे नाते आणखी घट्ट होत आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षवर्धनच्या तोंडातून खरा हेतू बाहेर पडल्याने सावनीला धक्का बसतो. तर, दुसरीकडे आरती मुक्ताला कार्तिकचे खरे रुप सांगणार आहे. प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये काहीशी भावूक, संवेदनशील गोष्ट पाहायला मिळणार आहे.
आदित्य आजारी, सागरने रद्द केली मिटिंग
आदित्य आजारी असल्याचे सावनी सागरला सांगते. सागर तातडीने सावनीला घरी जाऊयात असे सांगतो आणि मीटिंग रद्द करतो. सावनीसोबत सागर आदित्यला भेटायला घरी जातो. आदित्य तापाने फणफणत असतो. आदित्यची सागरला पप्पा तुम्ही मला कुठेही सोडून जाऊ नका. तुम्ही इथेच थांबा असे सांगतो. सागर आदित्यला औषध घेण्यासाठीचा आग्रह धरतो. पण आदित्य नकार देतो. मी औषध घेऊन बरा झालो तर तुम्ही मला सोडून जाल असे सांगतो. मी बरा झालो तर तुम्ही मला भेटायला याल हे प्रॉमिस द्या असं आदित्य सांगतो. सागरला त्याला आपण भेटायला येणार असल्याचे वचन देतो. त्यानंतर आदित्य औषध घेतो. आदित्य आणि सागरमधील भावनिक बंध पाहुन सावनीच्या मनात चिंता निर्माण होते.
हर्षवर्धन सावनीला सांगणार मनातली गोष्ट
सागरला घरी पाहून मद्यधुंद अवस्थेत असलेला हर्षवर्धन सावनीवर संशय घेतो. मी घरी नसल्याचे पाहून तुम्ही मज्जा मारत होते का, असा प्रश्न विचारतो. सावनी त्यावर हर्षवर्धनची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. त्यावरून हर्षवर्धन आणि सावनीचे वाद होतात. मी आदित्यचा बाप नसूनही त्याला पोसतोय असे हर्षवर्धन सांगतो. सागरपेक्षा मी कसा भारी आहे, त्याची काळजी घेतो यासाठीच मी खर्च करत असल्याचे हर्षवर्धन सांगतो. हर्षवर्धनच्या मद्यधुंद अवस्थेत बोलण्यातून त्याच्या मनात काय सुरू आहे, हे सावनीच्या लक्षात येते.
तिकडे सागर आदित्यची मायेने विचारपूस करत असतो, त्याला धीर देत असतो. हे पाहून सावनी भावूक होते आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.
कार्तिकच्या मनात काय?
इंद्रा कार्तिकला खीर खायला देते. कार्तिक आपल्या चांगल्या वागणुकीने इंद्रा आणि स्वातीच्या डोळ्यात धूळफेक करत असतो. घरातल्या लोकांनी मुव्ही पाहण्याचा प्लान केला असतो. त्यासाठी स्वाती घाई करत असते. कार्तिक शर्टवर खीर सांडतो आणि शर्ट बदलून येतो असे सांगत स्वाती, इंद्राला पुढे जाण्यास सांगतो. शर्ट बदलण्याच्या बहाण्याने घरी थांबलेल्या कार्तिकच्या मनात नेमकं आहे तरी काय?
आरती उघड करणार कार्तिकचा खरा चेहरा
इंद्राने कार्तिक बाजू घेतल्याने क्लिनिकमध्ये असलेली मुक्ता चिंतेत असते. तिला काळजी सतावत असते. सागरला ती फोन करण्याचा प्रयत्न करत असते. पण, त्याचा फोन लागत नाही. आई-बाबांचा फोन लागत नसतो. त्यामुळे घरात घडलेला प्रसंग कोणाला सांगावं असा विचार मुक्ता करत असते. तेवढ्यात आरती मुक्ताकडे आपला राजीनामा देत नोकरी सोडत असल्याचे सांगते. मुक्ता तिची समजूत घालते. त्या मुलामुळे किती नोकरी सोडणार असे मुक्ता आरतीला सांगते. त्यावर आरती तो माणूस खूप वाईट असून तुम्ही त्याच्यापासून सावध राहा असे सांगते. आरतीच्या बोलण्याने तो मुलगा मला ओळखतो असे विचारते. त्यावर आरती तो मुलगा कार्तिक असल्याचे सांगते. कार्तिकने दुबईतील मुलीच्या ब्लॅकमेलिंगच्या नावाखाली सागरची फसवणूक करत 15 लाख रुपये घेतले असल्याचे मुक्ताच्या लक्षात येते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
