एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्तामध्ये फुलतंय प्रेमाचे नाते, हर्षवर्धन खरंच सावनीसोबत लग्न करणार?

Premachi Goshta Serial Update : एकीकडे सागर आणि मुक्तामध्ये प्रेम फुलत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीसोबत लग्न करणार का, सावनी मिहिरकडे राहण्यास जाणार का?

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta ) मालिकेत आता वेगळ वळण येणार आहे.  एकीकडे सागर आणि मुक्तामध्ये प्रेम फुलत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीसोबत लग्न करणार का, सावनी मिहिरकडे राहण्यास जाणार का, या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. 

हर्षवर्धनच्या बोलण्यावर सावनी भुलणार

वेगळे राहिल्याने लग्नाच्या विधी कशा परंपरेने पार पडतील. हळद, लग्नाची वरात, लग्नाच्या आधीची हुरहूर हे सगळे अनुभवता येईल असे हर्षवर्धन सावनीला सांगतो. सावनीच्या त्याच्या बोलण्यावर भाळते आणि मलादेखील असेच लग्न करायचे होते असे सांगते. आपला डाव यशस्वी होतोय हे पाहून हर्षवर्धनला मनात आनंद होतो. 

मुक्ता-सागरमध्ये प्रेमाचे क्षण

मुक्ता आणि सागरमध्ये पुन्हा एकदा प्रेम फुलू लागले आहे. कठीण काळातून पुढे गेल्यानंतर दोघांच्या नात्यात  विश्वासाचे आणि प्रेमाचे नाते निर्माण होत आहे. मुक्ता तिच्या ब्लाउजची नॉट लावण्याचा प्रयत्न करत असते. सागर तिला बेडवरूनच पाहत असतो. तेव्हा मुक्ता त्याला असं पाहू नका म्हणून सांगते. सागर म्हणतो की मी तर झोपलो होतो. तु्म्ही म्हणताय की मी तुमच्याकडे पाहतोय याचा अर्थ तुम्हीच माझ्याकडे पाहत आहात असे सागर सांगतो. त्यानंतर सागर तिला मी तुम्हाला मदत करू का असं विचारतो. मुक्ता फारच लाजते.

मिहिर घेणार मिहिकाची शाळा

मिहिका ही मिहिरसाठी शिरा तयार करत असते. शिरा पिवळा करण्यासाठी हळद टाकावी असे मिहिका सांगते. त्यावर मिहिर तिला शिऱ्यात केसर टाकतात, त्यामुळे तो पिवळा होतो, असे सांगते. हे ऐकून मिहिका केसर आणण्यासाठी मुक्ताच्या घरी, अर्थात कोळींच्या घरी जाते. 

सावनी करणार मिहिरला फोन

हर्षवर्धनने मिहिरच्या घरी जाऊन राहण्यास सांगितल्यानंतर सावनी मिहिरला फोन करते. त्यावेळी मिहिका मुक्ताकडे गेलेली असते. सावनीचा फोन मिहिर उचलतो. त्यावर तो  मी काही दिवस, लग्न होईपर्यंत मी तुझ्याकडे राहण्यास येऊ का असे विचारते. माझा एकच भाऊ आहे, तुझ्याशिवाय कोणीच नाही असे मिहिरला सांगते.मिहिर सांगतो की सध्या मी ज्या घरी राहतो ते घर लहान आहे. तर, नवीन घराच्या इंटिरिअयरचे काम सुरू आहे असे सांगतो.

मिहिर करणार मुक्ता-सागरसोबत चर्चा

सावनीचा फोन आल्यानंतर मिहिर हा सागर-मुक्ता सोबत बोलतो. सावनीची ही सगळी नाटके असल्याचे सागर म्हणतो. मिहिरदेखील त्याला दुजोरा देतो. सावनी-हर्षवर्धनचे लग्न होईपर्यंत मी लग्न करणार नसल्याचे मिहिर बोलतो. यावर सागर-मुक्ता त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण, मिहिरच्या स्पष्टीकरणावर सागरही दुजोरा देतो. त्यावरून मुक्ता-सागरमध्ये प्रेमळ वाद निर्माण होतो.

मुक्तावर माधवी संतापणार

सावनीच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची याचा विचार मुक्ता करते. तेवढ्यात ती सागरला आपल्या माहेरी, माधवीच्या घरी बोलवते. मुक्ता माधवीकडे अळूच्या वड्या घेऊन येते. त्यावेळी मुक्ताच्या तोंडातून सावनीचे टेन्शन सुरू होते असे बोलते. त्यावरून माधवी आणि पुरूंना धक्का बसतो. नेमकं काय झाले हे मुक्ता सांगते आणि सावनीला या घरात राहू देणार का असे विचारते. मुक्तावर माधवी चिडते. तुझी हिंमत कशी झाली त्या बाईला आपल्या घरात राहायला आणायची. त्यावर मुक्ता माधवीला समजावण्याचा प्रयत्न करते. सावनीचा जरी सागरचा भूतकाळ असली तरीही नात्याने मिहीरची सखी बहिण लागते. मिहिकाची ती नणंद असणार आहे त्यामुळे तिच्यासोबत आपले नाते असणार असल्याचे मुक्ता माधवीला सांगते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget