(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Serial Update : सागर अटकेत, कोळी कुटुंब दु:खात, स्वातीला होतोय पश्चाताप? प्रेमाची गोष्टमध्ये आज काय पाहणार?
Premachi Goshta Serial Update : सागरच्या सुटकेसाठी मुक्ता काय करणार, सागर आपलं निर्दोषत्व सिद्ध करणार का, हे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट'च्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
Premachi Goshta Serial Update : घरातील स्टोअर रुममध्ये एका बॅगेत सोनं, रोकड मिळाल्याने आयकर विभाग, पोलीस सागरला अटक करतात. आता, या अटकेमागील सूत्रधार कळणार का, सागरच्या सुटकेसाठी मुक्ता काय करणार, सागर आपलं निर्दोषत्व सिद्ध करणार का, हे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी पोलिसांनी आयकर विभागाने सागरला अटक केल्याने कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. इंद्रा सतत रडत आहे. तर बापू, मिहिर आणि मुक्ताकडून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मुक्ता वकिलांना फोन करून झाल्या प्रकाराची माहिती देते. काही करुन सागरचा जामीन झाला पाहिजे असे मुक्ता वकिलांना सांगते. तर, सागरला अटक केल्याने स्वातीच्या मनाला वाईट वाटते. कार्तिकने जे कृत्य केलंय ते चुकीचे आहे. सागरच्या अटकेसाठी कार्तिकने दिलेली ती बॅग कारणीभूत असते. त्यात तस्करी केलेले सोनं, रोख रक्कम आणि इतर गोष्टी असतात. ज्या बॅगेमुळे सागरला अटक झाली ती बॅग घरात कोणी आणली याचा विचार सगळेजण करत असतात.
स्वाती विचारणार कार्तिकला जाब...
स्वाती कार्तिकला भेटून सागरच्या अटकेवर जाब विचारते.आपला प्रॉब्लेम मुक्ता होती पण सागरला अटक करण्यात आल्याचे स्वाती कार्तिकला सांगते. त्यावर कार्तिक मी मुद्दाम केले नाही असे सांगतो. मला जे सांगितले तेच मी केले असे सांगतो. त्यावर स्वाती कोणी बॅग दिली असे विचारतो. त्यावर कार्तिक हर्षवर्धनचे नाव घेतो. हर्षवर्धनने सागरवरचा राग काढण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे कार्तिक सांगतो. हर्षवर्धन-सावनीपासून दूर राहण्यास सांगितले होते. पण, तू ऐकले नाही असे स्वाती कार्तिकला सुनावते. कार्तिक स्वातीला इमोशनल ब्लॅकमेल करतो.
सागरच्या अटकेचे सेलिब्रेशन...
सागरच्या अटकेवर हर्षवर्धन, कार्तिक आणि सावनीचे सेलिब्रेशन सुरू असते. त्यावेळी कार्तिक कशा प्रकारे स्वातीसमोर आपण नाटकं केल्याचे सांगतो. स्वातीचा माझ्यावर आंधळा विश्वास असून मी सांगतो त्याच्यावर ती विश्वास ठेवते असे कार्तिक सांगतो. कार्तिकमुळे सागर तुरुंगात गेल्याने हर्षवर्धन-सावनी त्याला पुढील प्रोजेक्टमध्ये बिझनेस पार्टनर म्हणून भागिदार करत असल्याचे सांगतात.
मुक्ताला कळणार अटकेमागील सूत्रधार...
सागरच्या जामिनासाठी मुक्ताची धडपड करते. सागरच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न करा, त्याचा 24 तासांत जामीन झाला पाहिजे असे मुक्ता वकिलांना सांगते. घरी मुक्ता मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना जोडून पाहते. आधी तिच्यावर आणि क्लिनिकवर कारवाई, नंतर सागरला अटक यामागे सावनीच असल्याचा संशय मुक्ताला येतो. सागरला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचे मुक्ता सांगते. मुक्ता एकवीरा देवीकडे प्रार्थना करत असताना दुसरीकडे सागरचा तुरुंगातून फोन येतो. कोणत्याही परिस्थितीत लग्न पुढे ढकलायचे नाही असे सागर सांगतो. मी तुरुंगात असून कधी बाहेर येईल माहित नाही. सगळ्या गोष्टी वेळेत करुयात असे सागर मुक्ताला सांगतो. सागरचा फोन कट झाल्यानंतर मिहिर घरी येतो आणि सगळ्यांसमोर सागर तुरुंगात असताना मी माझे लग्न करू शकत नाही, लग्न पुढे ढकलूयात असे सांगतो. बापू त्याला ठरल्या वेळेत लग्न करुया असे सुचवते. मुक्ताही लग्न पुढे ढकलू नकोस असे सांगत सागरने नेमकं काय म्हटले हे सांगते.