Premachi Goshta Latest Episode : हर्षवर्धन-सावनीने टाकला मोठा डाव; सागर सापळ्यात फसणार की डाव उलटवणार?
Premachi Goshta Latest Episode : सागरला घेरण्यासाठी त्याच्याविरोधात सावनी आणि हर्षवर्धन अधिकारी या दोघांनी नवा कट आखला आहे. आ
Premachi Goshta Latest Episode : सागर आणि मुक्ताची 'प्रेमाची गोष्ट' सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे सागरला घेरण्यासाठी त्याच्याविरोधात सावनी आणि हर्षवर्धन अधिकारी या दोघांनी नवा कट आखला आहे. आता सागरला घेरण्यात हे दोघे यशस्वी होणार का, हे 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत दिसणार आहे.
आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?
प्रेमाची गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये मुक्ताच्या मनात सागरबद्दल प्रेम फुलू लागले असल्याचे दिसते. सकाळी नाश्ता तयार करत असताना मुक्ताला मळमळते आणि उल्टी होते. त्यावेळी मुक्ताला दिवस गेले असल्याचा समज स्वाती करते आणि त्यातून सगळा गोंधळ होतो. मुक्ता आई होऊ शकत नाही हे इंद्राला माहित असते. पण ही गोष्ट इंद्रा नकळतपणे सगळ्यांसमोर म्हणते. त्यावर भावूक झालेली मुक्ता मी सईची आई झालीय असे म्हणते. घरातील इतर सदस्यदेखील तिच्या म्हणण्याला दुजोरा देतात.
सागर विरोधात हर्षवर्धन-सावनीचा कट
हर्षवर्धन-सावनीने सागरविरोधात नवा कट आखला आहे. सागर आपल्या कंपनीच्या मिटिंगमध्ये एका नव्या प्रोडक्टबाबत आणि त्याच्या मॉडेलिंगबाबत चर्चा करतात. त्याच वेळी हर्षवर्धन आणि सावनीची एन्ट्री होते. या दोघांना ऑफिसमध्ये पाहून सागरला धक्का बसतो. त्यावेळी सागर सावनीला म्हणतो की पार्टी नाही, कोणीही यावे, ही मिटिंग सुरू आहे.सागर त्यांना उलटसुलट बोलत असताना हर्षवर्धन सागरला संचालक राघव श्रॉफ यांच्याकडून मी त्यांच्याकडील शेअर्स विकत घेतले असल्याचे सांगतो. मी तुझ्यासोबत बिझनेस करणार नाही. मला किळस येते असे सागर हर्षवर्धनला सांगतो. सागरला इतर संचालक मंडळ सदस्य सबुरीचा सल्ला देतात आणि कायद्यानुसार हर्षवर्धन आता संचालक असतील असे म्हणतात.
सावनी सागरसाठी गिफ्ट म्हणून एक पोट्रेट आणते. त्या पोट्रेटमध्ये सावनी असते. नव्या प्रोडक्टसाठी हीच चांगली मॉडेल आहे, असे हर्षवर्धन सांगतो. त्यावर सागर नकार देतो आणि प्रोडक्ट माझे आहे आणि मॉडेल मीच ठरवणार. सावनी, हर्षवर्धन आणि सागरमध्ये शाब्दिक वाद होतात.
हर्षवर्धन-सावनीच्या या नवीन डावाला सागर कसे प्रत्युत्तर देणार, सागर आता सावनीलाच मॉडेल म्हणून निवडणार की त्याच्यासमोर इतरही काही पर्याय आहेत का, हे आता पुढील भागात स्पष्ट होईल.