एक्स्प्लोर
'या' नाटकातून परेश रावल यांचं मराठी नाटकात पदार्पण
परेश रावल निर्मित या मराठी नाटकात अभिनेता सचित पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. सचितने इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर नाटकाचं पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे दमदार अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल आता लवकरच मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. परेश रावल यांच्या ‘महारथी’ या गाजलेल्या नाटकाचं मराठीत रुपांतर होणार आहे. या नाटकात परेश रावल अभिनय करणार नसून ते या नाटकाचे निर्माते आहेत.
परेश रावल निर्मित या मराठी नाटकात अभिनेता सचित पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. सचितने इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर नाटकाचं पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ निर्मित त्यांच्याच ‘महारथी’ या गाजलेल्या नाटकात ते भूमिका साकारणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये सातत्याने दिसणारा सचित या नाटकाच्या निमित्ताने 19 वर्षांनंतर रंगभूमीवर पदार्पण करतोय. एका श्रीमंत सिनेनिर्मात्याकडे तो नोकरीला लागतो. त्या तरुणाची महत्त्वाकांक्षा आणि निर्मात्याच्या बंगल्यातलं गूढ उलगडणारं हे नाटक आहे. गेल्या महिन्याभरापासून या नाटकाची तालिम सुरु आहे. सिनेविश्वात काम करण्यासाठी इंदूरहून मुंबईत आलेल्या एका तरुणाची भूमिका सचित साकारतोय. सध्या सचित 3 सिनेमांमध्ये काम करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement