(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaucha Dhakka :'जिला कॅप्टन्सी अशीच मिळाली ती म्हणते तुम्हाला भीकमध्ये...', भाऊच्या धक्क्यावर निक्कीच्या कॅप्टन्सीवरुन खडेबोल
Bhaucha Dhakka : रितेश देशमुखने निक्कीला कॅप्टन झाल्यावर तिच्या वागण्यावरुन तिचा चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) भाऊच्या धक्क्यावर निक्की,अरबाज, वैभव आणि जान्हवी या चौघांचीही चांगलीच शाळा घेण्यात आली. त्यांच्या वागण्याचं आणि खेळावर रितेशने त्यांची कानउघडणी देखील केली. इतकच नव्हे तर जान्हवीला तिच्या वागण्यामुळे आठवडाभर जेलमध्येही राहण्याची शिक्षा दिली आहे. तसेच या आठवड्यात तिची भाऊच्या धक्क्यावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
'...तुम्हाला भीकमध्ये काय मिळालं'
रितेशने निक्कीला म्हटलं की, निक्की या आठवड्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. पॅडी भाऊंना तुम्ही काय म्हणालात. त्यावर पॅडीने म्हटलं की, ते लोकं म्हणतात की, तुम्हाला भीकमध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यावर मी म्हटलं की, मला भीक नको फळं हवी आहेत. ते माझे त्यांना हसवण्यासाठीचे प्रयत्न नव्हते तो माझा राग होता. त्यावर रितेशने म्हटलं की, हे चांगलंय ज्या व्यक्तीला कॅप्टन्सीच अशी मिळाली आहे, ती व्यक्ती तुम्हाला सांगते तुम्हाला भीकमध्ये काय मिळालं आहे.
'ही इम्युनिटी तुम्हाला गिफ्टमध्ये मिळाली'
निक्कीच्या कॅप्टन्सीवरुन रितेशने म्हटलं की, 'मी तर कुणाचच ऐकत नाही,मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. निक्की तुम्ही प्रेक्षकांना तरी घाबरा. कारण कॅप्टन्सी ही एका आठवड्याची आहे, हा शो शंभर दिवसांचा आहे. ही इम्युनिटी तुम्हाला गिफ्टमध्ये मिळाली आहे. पण पुढच्या आठवड्यात काय होईल हे मलाही माहित नाही.'
'इथे क्विन निक्की आहे आणि सगळे त्यांचे गुलाम'
पुढे रितेशने म्हटलं की, निक्की तुम्ही हलक्या कानाच्या आहात. कानात कुणीतरी कुजबूज केली, काहीतरी म्हटलं तर सरळ उठून जाऊन भांडायचं. हा आहे निक्कीचा पॅटर्न.तुम्हाला वाटतं की, तुम्ही घर चालवता, पण निक्की तुम्हाला घरातले चालवतायत. इथे ग्रुप ए नाहीच आहे, इथे क्विन निक्की आहे आणि सगळे त्यांचे गुलाम. गुलाम 1 अरबाज, गुलाम 2 अरबाज 2 (वैभव) गुलाम 3 सावली (जान्हवी) गुलाम 4 असिस्टंट (घन:श्याम)
'दुसऱ्याचं जेवण काढायचं'
निक्कीने घरात आर्याचं जेवणही काढलं. त्यावर रितेशने तिला म्हटलं की, 'आर्या जेव्हा वाटीभर डाळ घेत होती, तेव्हा काय म्हणालात तुम्ही. संपेल घरातल्या लोकांना मिळणार नाही. स्वत: ला जेव्हा खायचं असतं तेव्हा सगळं ठीक असतं पण दुसऱ्याचं जेवण काढायचं. तुम्ही म्हणता मी एका शोमध्ये टॉप 3 मध्ये आहोत. त्या शोचा आणि या शोचा काहीही संबंध नाही.'