Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Ashwini Mahangade: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची खास पोस्ट; म्हणाली, 'नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर...'
Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये अनघा ही व्यक्तिरेखा साकरते. अश्विनीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अश्विनी ही सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अश्विनीनं नुकतीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti ) जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : आलिशान बंगला अन् महागड्या गाड्या; 'तारक मेहता...' मालिकेतील जेठालाल खरचं कोट्यवधींचा मालक आहे? दिलीप जोशींनी सांगितलं सत्य
Dilip Joshi On Rumours Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : दिलीप जोशी (Dilip Joshi) गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचा अभिनय आणि विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दीलीप जोशी यांच्याकडे आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या असल्याच्या बातम्या येत होत्या. आता त्यांनी यावर मौन सोडलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'मदर्स-डे' निमित्त प्रिया मराठेनं 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा खास व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले, 'मोनिकासारखी आई असेल तर...'
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या मालिकेमधील मोनिका ही भूमिका साकरणारी प्रिया मराठे (Priya Marathe) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. प्रियानं मदर्स-डेच्या निमित्तानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोनिका आणि पिहू या दिसत आहेत. या व्हिडीओला काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chala Hawa Yeu Dya: मोठ्यांनाही लाजवेल अशी बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; ‘चला हवा येऊ द्या’चा प्रोमो पाहून खळखळून हसाल
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या लहान तोंडी मोठा घास या स्पेशल एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये बच्चे कंपनी एक विनोदी स्किट सादर करताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : आईच्या साडीत सुद्धा ईशाला जाणवते मायेची ऊब; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच ईशा आणि अनिशचा साखरपुडा पार पडणार आहे. दरम्यान अरुंधतीजवळ ईशा थोडी भावूक झाली आहे. आईच्या साडीत सुद्धा ईशाला मायेची ऊब जाणवत आहे.